Mumbai Accident: कलिनासमोर भीषण अपघात; गाड्यांचा चक्काचूर, चार जण जखमी

Latest Mumbai News : बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
Mumbai Accident: कलिनासमोर भीषण अपघात; गाड्यांचा चक्काचूर, चार जण जखमी
Updated on

Latest Mumbai News : मुंबईच्या सांताक्रुज परिसरात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एका डंपरने चार वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.(kalina Flyover Accident)

मुंबई विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कलीना युनिव्हर्सिटी समोर असलेल्या उड्डाणपुलावरुन वेगात हा डंपर जात होता. यावेळी खाली जाणाऱ्या डंपरने सामोरील चार गाड्यांना धडक दिल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात दोन कार आणि दोन रिक्षांचं प्रचंड नुकसान झालं आहे. (Mumbai Accident latest News)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.