Mumbai Accident: अंधेरित ड्रेनेजमध्ये पडून महिलेच्या मृत्यू प्रकरणात मेट्रो अन् कॉन्ट्रॅक्टरच जबाबदार; समितीच्या अहवालात नमूद

East Andherit drainage death of woman: सदर दुर्घटनेनंतर याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे प्रमुख महापालिका उपायुक्त देविदास क्षीरसागर होते.
drainage
drainage
Updated on

Mumbai Accident: अंधेरी पूर्व येथे उघड्या ड्रेनजमध्ये पडून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. सदर घटनेमुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली होती, कारण हा निष्काळजीपणामुळे गेलेला जीव होता. प्राथमिक तपासणीत याप्रकरणी मेट्रो प्रशासन जबाबदार असल्याचं समोर आलं होतं. आता या दुर्घटनेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड (𝐌𝐌𝐑𝐂𝐋) आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरले आहे.

सदर दुर्घटनेनंतर याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे प्रमुख महापालिका उपायुक्त देविदास क्षीरसागर होते. याशिवाय या समितीमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि बीएमसीचे दक्षता अधिकारी अविनाश तांबेवाघ दे दोन सदस्य होते. या समितीने आपला अहवाल सोमवारी सादर केला आहे.

drainage
Mumbai Road Accident : गोरेगावातील ओबेरॉय मॉलसमोर भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं! 13 वर्षीय मुलीचा जागेवर मृत्यू

समितीने आपल्या अहवालामध्ये मेट्रो प्रशासनाला आणि कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरले आहे. त्यामुळे यापुढे मेट्रो आणि कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अहवालात असं नमुद आहे की, सदर जमीन २०१५ पासून MMRCL च्या ताब्यात आहे. परिसरातील अपूर्ण कामाबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ११ जुलै रोजी MMRCL ला पत्र लिहून कळवले होते. याला कॉन्ट्रॅक्टरने २४ आणि २५ ऑगस्टला उत्तर देखील दिलं होतं. अपूर्ण काम पूर्ण केले जाईल असं उत्तरात म्हणण्यात आलं होतं.

drainage
Mumbai Crime: 3 काका रिक्षामधून आले अन्...; आई रागवत असल्याने शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव

नेमकं काय झालं होतं?

२५ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यावेळी विमला विमल अनिल गायकवाड या रस्त्यावरून चालल्या होत्या. रस्त्यावर खूप पाणी असल्याने ते डिव्हायडरच्या बाजूने चालत होत्या. या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु होते. याठिकाणचे ड्रेनेजचे होल झाकण्यात आले नव्हते, ते तसेच उघडे ठेवण्यात आले होते. पाणी साचलं असल्याने विमला यांना ड्रेनेज दिसू शकलं नाही. त्या त्यात पडल्या अन् त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.