Palghar Train Accident: पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी ५ ते ६ डब्बे घसरले; लोकल रेल्वे सेवा ठप्प

Palghar Train Accident: पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी ५ ते ६ डब्बे घसरल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प झाली आहे.
Palghar Train Accident
Palghar Train AccidentEsakal
Updated on

पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी ५ ते ६ डब्बे घसरल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्टेशनवरती पलटी झाली आहे. मालगाडीचे ५ ते ६ डब्बे पुर्णपणे पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा पुर्णपणे ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही डब्बे घसरले आहेत तर काही डब्बे पुर्णपणे पलटी झाले आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा ठप्प आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

Palghar Train Accident
Porsche Accident : 'ससून'च्या चौकशी समितीला बिर्याणीची मेजवाणी; पुण्यातल्या 'या' प्रसिद्ध हॉटेलातून आलं पार्सल

मिळाल्या माहितीनुसार, ही मालगाडी मुंबईकडे जात असताना ही घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून चौथ्या रुळावर क्रॉसिंग करत असताना अपघात घडला आहे. मुंबईकडे जाणारे वाहतूक सध्या ठप्प आहे. या अपघात कोणतीही जीवित हानी नसली तरी मालगाडीचे डबे रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वेची मुंबईकडील वाहतूक कोलमडली.

Palghar Train Accident
Pune Accident News : अन् आई-वडिलांचे स्वप्न अधुरेच राहिले... पुण्यातील अपघातात लातूरच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

घसरलेली मालगाडी पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. मालगाडीचा अपघात इतका भीषण होता की, दोन क्रमांकाचा रेल्वे ट्रक पूर्णपणे उखडले गेले आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवली जात आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com