मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने खंडणीच्या प्रकरणात गुंड छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मकोकाकायद्यातर्गत कारवाईचा अवलंब केला आहे. सलीम फ्रूटने त्याचा सहाय्यक रियाझ भाटी याच्यासमवेत वर्सोवा येथील व्यावसायिकाकडून सुमारे 30 लाख किमतीची रेंज रोव्हर जबरदस्तीने काढून घेतली होती.मकोका चे कलम सामान्यत: संघटित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये कार्यरत व्यक्ती किंवा व्यक्तींच्या गटाविरुद्ध लागू केले जातात. सलीम फ्रुटला शनिवारी मकोका कोर्टात हजर केले असता त्याला 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
एनआयएने फ्रूटला अटक केल्यानंतर, त्याचा सहाय्यक भाटीने तक्रारदाराची अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये भेट घेतली आणि त्याला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली अन्यथा तो संपूर्ण डी-कंपनीचा रोष ओढवून घेईन. याप्रकरणी भाटीलाही अटक करण्यात आली होती.दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनीस आणि छोटा शकील यांच्यासह इतरांविरुद्ध 3 फेब्रुवारी रोजी दिल्लीत एनआयएने गुन्हा दाखल केला आहे.
दहशतवादी कारवायांसाठी निधी उभा करणे तसेच दहशतवादी कारवायात सहभाग असल्याबद्दल एनआयएने फ्रूटला या वर्षी 4 ऑगस्ट रोजी अटक केली होती. शस्त्र तस्करी, अंमली पदार्थ तस्करी- दहशतवादी कारवायासाठी निधी उभारणे, मनी लाँड्रिंग, बनावट भारतीय चलन प्रसारित करणे, मालमत्तांचाअनधिकृत ताबा ठेवणे किंवा दहशतवादी निधी उभारण्यासाठी मालमत्ता संपादन करणे आणि जैश-ए-मोहम्मद अल कायदा, लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांसोबत सक्रिय सहकार्याने काम करणे असे विविध आरोप आहे. .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.