मुंबईत एका महिन्यात होम क्वारंटाईनच्या संख्येत 50 टक्के घट

मुंबईत होम क्वारंटाईनची संख्या 50 हजारांच्या आत
home quarantine
home quarantinesakal media
Updated on

मुंबई : मुंबईत (Mumbai) नव्या कोरोना रुग्णांपेक्षा (new corona patient) बरे झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची (active patients) संख्या कमी झाली असून 5 हजारांच्या खाली आहे. या सर्वाचा सकारात्मक परिणाम झाला असून मुंबईतील होम क्वारंटाईन व्यक्तींची (home quarantine)  संख्या जुलै महिन्याच्या तुलनेत 50 टक्क्यांनी घटली आहे. ( Mumbai-active patients-home quarantine-new corona patient-corona udate-nss91)

मुंबईत सध्या 300 च्या घरात कोरोना रुग्ण आढळत आहेत. सध्या मुंबईतील होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तींची संख्येत लक्षणीय घट झाली असून 49 हजार 957 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत. पालिकेच्या डॅशबोर्डनुसार, मुंबईत 3 जुलै या दिवशी 1 लाख 22 हजार 180 होम क्वारंटाईन असणाऱ्यांची नोंद झाली होती. त्याआधीही 1 जुन 2021 ला 2 लाख 82 हजार 637 व्यक्तींची होम क्वारंटाईन मध्ये नोंद झाली होती. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत सातत्याने घट झालेल्या आकडेवारीचे निरीक्षण केल्यास मुंबईतील होम क्वारंटाईन होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. तर, 31 मार्चपर्यंत रुग्णसंख्या 4 लाखांहून अधिक होती.

home quarantine
कौंटुबिक प्रकरणात मुलांसाठी वकीलांचे स्वतंत्र पथक नेमावे, संघटनेची मागणी

चार महिन्यांचा आलेख

10 एप्रिल- 6,00,027

1 जून - 2,11,078

3 जुलै - 1,22,180

6 ऑगस्ट - 49,957

तर कोरोना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत एकुण 79 लाख 34 हजार 359  होम क्वारंटाईन पूर्ण केले आहे. तर, 1 लाख 55 हजार 539 व्यक्तींनी संस्थात्मक क्वारंटाईन पूर्ण केले आहे. सध्या फक्त 763 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये होते.

हाय रिस्कचा वाढता धोका

मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली तरी हाय रिस्कचा धोका कायम आहे. सद्यस्थितीत 70 टक्के हाय रिक्स कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहेत. पालिकेच्या डॅश बोर्डच्या माहितीप्रमाणे, गेल्या 24 तासांत 4237 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. यात 2 हजार 951 जण हाय रिस्क कॉन्टॅक्टस असल्याचे समोर आले. हे प्रमाण तब्बल 70 टक्के आहे. तर 1 हजार 286 कमी रिस्क कॉन्टॅक्टस आढळून आले.  हे प्रमाण 30 टक्के आहे.

मुंबईत आता बऱ्यापैकी रुग्णसंख्या कमी होत आहे. कोरोना विरोधातील युद्धात मुंबई महापालिकेने लढा पुकारला असून टेस्टिंग , कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे, दरम्यान संशयितांना क्वारंटाईन करणे, होम आयसोलेशन करणे देखील सुरु आहे असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.