Mumbai Ahmedabad Highway : पावसाचा तांडव, मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला

Rain News| अवजड वाहनांची चाके मार्गावर अडकली आहेत |The wheels of heavy vehicles are stuck on the road
 पावसाचा तांडव, मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला
Mumbai Ahmedabad Highway sakal
Updated on

Mumbai Ahmedabad Highway : मुसळधार पावसाचा महामार्गाला फटका बसला असून मुंबई अहमदाबाद मार्ग खचला आहे. नायगाव- भाईंदर दरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहीती मिळत आहे. यावेळी अवजड वाहनांची चाके मार्गावर अडकली आहेत.

पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला असून, वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शो रूम जवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला आहे.. माती खचण्याची हि गेल्या 10 दिवसातील दुसरी घटना आहे.

 पावसाचा तांडव, मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला
Accidnet News: मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक

खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.. आज पहाटे च्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. दहा दिवसा पूर्वी घोडबंदर जवळ मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना माती धस्ली आणि त्यात जेसीबी सह त्याचा चालक माती खाली गाडला गेला होता.

 पावसाचा तांडव, मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला
Pune Traffic Jam: चार चाकी गाडीचा अपघात झाल्याने सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

त्याचे पुढे काय झाले ते अजून समजले नाही. त्यातच मुंबई अहमदाबाद महामार्गावर सीमान्त काँक्रिटीकरण सुरु असल्याने अगोदरच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना आता रस्ता खचल्याने त्याचा हि त्रास सहन करावा लागत आहे.

येत्या पावसाळ्यात महामार्गावरील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर खाद्याचे साम्राज्य असणार असल्याचे चित्र आता पासूनच दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करताना सांभाळून करावा लागणार आहे.

 पावसाचा तांडव, मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला
Pune Rain News :" कॅबवाल्यांनी पावसात प्रवाशांना ‘धुतले’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.