मनोर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणून मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी पालघर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, प्रबंधक सुमीत कुमार, देखभाल-दुरुस्ती कंत्राटदार, रोड सेफ्टी ऑडिटर यांना महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्हा अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस मुख्यालयात शुक्रवारी (ता. २५) बैठक झाली. या वेळी महामार्गावरील अपघातांची कारणे आणि उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
या तलासरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय मुदडक, कासा प्रभारी अधिकारी नामदेव बंडगर, मनोरचे सतीश शिवरकर, जिल्हा वाहतूक शाखा प्रभारी असिफ बेग, महामार्ग सुरक्षा पोलिस पथकाचे सहायक निरीक्षक राजेंद्र ठाकुर, चारोटीचे पोलिस उपनिरीक्षक इर्शाद सय्यद उपस्थित होते. या वेळी अपघातांची कारणे आणि उपाययोजनांची चर्चा करण्यात आली.
सुचवलेल्या उपाययोजना
महामार्गावर धोकादायक ठिकाणी दिशादर्शक-वेगमर्यादा, अपघातप्रवण क्षेत्र फलक लावणे.
खानिवडे टोलनाका ते आच्छाड चेकपोस्टदरम्यान खड्डे तात्काळ बुजवणे.
खानिवडे ते आच्छाडदरम्यान प्रकाश योजना, रम्बलर स्ट्रिप्स यांची उपाययोजना.
दुभाजकांची उंची वाढवणे, जेणेकरून अपघातग्रस्त वाहने दुसऱ्या वाहिनीवर जाणार नाहीत.
बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करून तात्काळ त्या सुरू कराव्यात.
अत्याधुनिक क्रेन, रुग्णवाहिका, महामार्ग गस्ती वाहने तैनात करावीत.
अनावश्यक रोड कट आहेत,
ते बंद करून सुरक्षा रक्षक
जाळी बसवणे.
अत्याधुनिक आणि उच्चप्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे.
जव्हार फाटा क्रॉसिंग बंद करून सेवा रस्ता बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अपघात रोखून बळींची संख्या घटवण्याबाबत चर्चा केली. दुर्घटना रोखण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी क्रेन, रुग्णवाहिका अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.