Mumbai Air Pollution Update
Mumbai Air Pollution UpdateeSakal

Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचं प्रदूषण वाढलं; बीकेसी आणि चेंबूर ‘ऑरेंज झोन’मध्ये

बीकेसी आणि चेंबूरच्या तुलनेत बाकी परिसरामध्ये कमी प्रदूषणाची नोंद झाली आहे.
Published on

मुंबई : व्यापारी हब असलेले बीकेसी आणि रासायनिक कारखान्यांची नगरी चेंबूरमध्ये आज हवेची गुणवत्ता खालावल्याचे दिसले. दोन्ही परिसरामध्ये अनुक्रमे २१९ आणि ३०० हवा गुणवत्ता निर्देशांकासह वाईट स्तर नोंदवला गेला. त्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत दोन्ही परिसर ऑरेंज झोनमध्ये आहेत. परिणामी मुंबईतील प्रदूषण अद्याप कमी झाले नसल्याचे दिसले.

बीकेसी आणि चेंबूरच्या तुलनेत बाकी परिसरामध्ये कमी प्रदूषणाची नोंद झाली आहे. त्याच्या खालोखाल मालाडमध्ये १९८, नवी मुंबई १९०, कुलाबा १९० आणि अंधेरी १८६ एक्यूआयसह मध्यम प्रदूषणाची नोंद झाली. त्याशिवाय भांडुप, माझगाव, वरळी आणि बोरिवली परिसरातही मध्यम प्रदूषणाची नोंद झाली.

दक्षिण मुंबईत हवेचा स्तर बऱ्याचदा खालावलेला असतो. आज मात्र दक्षिण मुंबईच्या तुलनेत उपनगरांमध्ये अधिक प्रदूषण दिसले. दक्षिण मुंबईच्या तुलनेत उपनगरांमध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प आणि रस्त्यांची बांधकामे अधिक सुरू असल्याने तिथे अधिक प्रदूषण असल्याचे दिसले. संपूर्ण मुंबईत १३९ हवा गुणवत्तेसह मध्यम प्रदूषणाची नोंद झाली आहे.

परिसर एक्यूआय स्तर
चेंबूर ३०० वाईट
बीकेसी २१९ वाईट
मालाड १९८ मध्यम
नवी मुंबई १९२ मध्यम
कुलाबा १९० मध्यम
अंधेरी १८६ मध्यम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.