Mumbai Crime : मुंबई विमानतळ बनलंय सोने तस्करीचा अड्डा; देशात पहिल्या क्रमांकावर

एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान मुंबई विमानतळावरील जप्ती देखील झपाट्याने वाढली आहे.
Gold
Goldsakal
Updated on

सीमाशुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या ११ महिन्यांत ३६० कोटी रुपयांचे ६०४ किलो तस्करी केलेलं सोनं जप्त केल्याचं उघड झालं आहे. दिल्लीतील ३७४ किलो आणि चेन्नईच्या ३०६ किलोग्रॅम सोने तस्करीला मागे टाकत अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये देशातील क्रमांक एकचे विमानतळ असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान मुंबई विमानतळावरील जप्ती देखील झपाट्याने वाढली आहे.

मुंबई सोन्याच्या तस्करांसाठी ट्रान्झिट हब आहे कारण यासाठी मोठी बाजारपेठ आहे; दागिन्यांसह अनेक सिंडिकेट रॅकेटर्सना वित्तपुरवठा केला जातो. आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईलाही पसंती असल्याचे सांगितले जाते. हैदराबादमध्येही सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये मंद गतीने वाढ झाली असून गेल्या वर्षी ५५ किलो तर या वर्षी १२४ किलो जप्त करण्यात आले आहे.

२०१९-२० मध्ये, कोरोनापूर्वी दिल्ली विमानतळावर ४९४ किलो, मुंबई ४०३ किलो आणि चेन्नई ३९२ किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले होते. २०२०-२१ मध्ये, सोन्याची तस्करी लक्षणीयरीत्या कमी झाली असताना, चेन्नई विमानतळावर १५० किलो, कोझिकोड येथे १४६.९ किलो, दिल्ली येथे ८८.४ किलो आणि मुंबई येथे ८७ किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

ऑक्टोबर २०२२ पासून मुंबईत सोन्याची तस्करी करताना २० हून अधिक परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या मते, आयात शुल्क ७.५ टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे भारतात मौल्यवान धातूची तस्करी २०२२ मध्ये ३३ टक्क्यांनी वाढून १६० टनांवर पोहोचली आहे.

दरम्यान, भारत पुरुषांना २० ग्रॅम आणि महिलांना ४० ग्रॅम सोने आणण्याची परवानगी देतो. ज्वेलर्सनी सांगितले की, एकूण ७२० टन सोने दरवर्षी भारतात येते, त्यातील ३८० टन कायदेशीररीत्या १५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के आयजीएसटी आणि बाकीचे ३४० टन, तस्करी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()