मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई; 12 किलो सोने जप्त

सुडानी नागरिकासह अटक करण्यात आलेल्या सर्वांची आता कसून चौकशी केली जातेय
सोने
सोने sakal
Updated on

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. तस्करीसाठी आणलेले तब्बल १२ किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. बिस्कीटाच्या स्वरुपात असलेल्या या सोन्याची किंमत ही तब्बल ५ कोटी ३८ लाख एवढी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सोन आणण्यासाठी तस्करांनी खास शक्कल लढवली होती. तस्करांनी ही सोन्याची बिस्कीटं एका बेल्टमध्ये लपवली होती, मात्र अधिकांऱ्यांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत आणि त्यांना विमातळावरच पकडण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. याप्रकरणी सूदान येथून आलेल्या ६ आरोपींना कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत विमानतळावर सध्या याबाबत चौकशी केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं कुठून आलं आणि ते कुणाकडून आणलं याचा तपास केला जाणार आहे. तसेच सोनं विदेशात नेमकं कुठे नेण्यात येणार होतं याचादेखील कस्टमचे अधिकारी तपास करणार आहेत.

सोने
बारामतीत घडी बंद पाडणारच, विकास केला म्हणजे उपकार केले नाहीत : बावनकुळे

आरोपीनं आपल्याकडे सोनं आहे, याची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती, असं कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही सुडानी नागरीक असल्याचीही माहिती समोर आली आहे. सुडानी नागरिकासह अटक करण्यात आलेल्या सर्वांची आता कसून चौकशी केली जातेय. हे सोनं कुठून आणलं? ते कुठे नेलं जात होतं? या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? या सगळ्याचा आता तपसा केला जातोय.

सोने
Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या घरात पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.