Mumbai : सर्व कायदेशीर, केवळ राजकीय दबावाखाली कारवाई; वायकर यांचे सोमय्यांना प्रत्युत्तर

Ravindra-Waikar
Ravindra-Waikarsakal media
Updated on

मुंबई - आमदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील हॉटेलवर हातोडा असा गौप्यस्फोट माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहेत. मात्र या याचे खंडण वायकर यांनी केले आहे.

ते म्हणाले मी कधीही बेकायदेशीर काम केले नाही. हॉटेल पाडल्याचे फोटो आहेत. ते जुने आहेत. जुन्या कायद्याप्रमाणे "सुप्रिमो" मी पाडले, नवीन कायद्यानुसार सर्व परवानग्या घेतल्या असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र राजकीय दबावापोटी हे सर्व चालू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Ravindra-Waikar
Crime : फोन हिसकावून घेतल्याचा राग; बायकोने झोपलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं उकळतं तेल

२०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने आमदार वायकर यांना जोगेश्वरी येथील व्यारवली गावात सर्व्हे क्र.१-बी, १-सी यावर २ लाख स्क्वेरफूट ५ स्टार हॉटेलचे बांधकाम करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली. ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित आहे.

वायकर यांनी ९ फेब्रुवारी २००४ रोजी मुंबई महापालिकेचे नियम, डीसीपीआर १९९१ च्या अंतर्गत या खेळाच्या मैदानाचा १५ टक्के, काही भाग स्पोर्ट्स एज्युकेशन सेंटर म्हणून विकसित करण्यासाठी परवानगी मागितली होती.

त्या समोरील उर्वरित मैदान हे कायमचे मैदान म्हणून आरक्षित राहणार आणि मनोरंजन मैदान म्हणूनच त्याचा वापर भविष्यात केला जाणार अशा प्रकारचे वचन दिले होते. २०२१ मध्ये वायकर यांनी ही गोष्ट लपविली, मुंबई महापालिकेची फसवणूक केली. असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Ravindra-Waikar
Agriculture Day : वसंतराव नाईकांच्या जन्मदिनी पंचायत समितीला मिळणार १० हजार रुपये, कृषी दिन साजरा होणार उत्साहात

ही गोष्ट महापालिका अधिकाऱ्यांना माहिती होती, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही माहिती होती आणि ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेलसाठी ही जागा वापरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने आता १५ जून २०२३ रोजी वायकर यांना या हॉटेलची परवानगी रद्द करण्यात येत आहे, असा आदेश दिला आहे असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी या संबंधात वायकर यांना नोटीस देऊन, स्पष्टीकरण मागविले. काही दिवसांपूर्वी नगरविकास खात्याने मुंबई महानगरपालिकेला या संबंधी कारवाई करण्यासाठी निर्देश दिल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

त्यावर मला साडेतीन वाजता तर माझ्या आर्किटेक्टला साडे अकरा वाजता नोटीस मिळाली. मात्र राजकीय सुडबुध्दीने हे सर्व चालले आहे. मी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. नवीन कायद्यानुसार मी बांधकाम केले आहेत. त्याच धर्तीवर अन्य लोकांनाही परवाग्या दिल्या आहेत. मग त्याची काय, असा सवाल वायकर यांनी केला आहे.

न्यायालयात जाणार

नोटीसा एवढ्या तत्परतेने दिल्या आहेत. हे सर्व राजकीय दबावापोटी चालले आहे. उद्या (ता. १७) मी न्यायालयात जाणार आहे. असे आमदार रवींद्र वायकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.