Mumbai : अंधेरी RTOच्या मोकळ्या जागा अवैध धंद्यांचा अड्डा

ऑडी, रेंज रोव्हर, बिएमडब्ल्यू कारच्या रात्रीला असते गर्दी
अतिक्रमण
अतिक्रमण sakal
Updated on

मुंबई : अंधेरी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. सुमारे ५० पेक्षा जास्त झोपड्या असून, त्यामध्ये अवैध मद्य तयार करणे, उघड्यावर मद्य पिण्याच्या पार्ट्या आणि जुगार सुरू आहे. धक्कादायक म्हणजे रात्र झाली की, ऑडी, रेंज रोव्हर, बिएमडब्ल्यू सारख्या उच्च दर्जाच्या कार मधून १६ ते २५ वयोगटातील अल्पवयीन मुलमुली याठिकाणी का येतात असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

यासंदर्भात पोलिस प्रशासन आणि जागेची मालकी असलेल्या अंधेरी आरटीओ विभागाला अनेकवेळा तक्रारी करूनही अद्याप तक्रारीची दखल घेतली नसल्याने, या जागेवर भविष्यात मोठी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता स्थानिक वात्सल्य इमारतीच्या रहिवाशीयांनी व्यक्त केली आहे.

फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आणि एकता असोसिएशन यांनी यापूर्वी अंधेरी आरटीओ अधिकाऱ्यांकडे मौखिक आणि लेखी तक्रारी केल्या असल्याचे वात्सल्य सोसायटीतील रहिवासी जयश्री पितळे या सांगतात. वात्सल्य सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवर ग्रिल लावण्यापूर्वी इथे अतिक्रमण नव्हते.

मात्र गेल्या पाच वर्षात झपाट्याने अतिक्रमण वाढले आहे. आम्ही करदाते असूनही बेकायदा अतिक्रमण करणाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. रात्री - अपरात्री या भागातून महिलांच्या ओरडण्याचे आवाज येत असून, बेकायदा पद्धतीने या झोपड्यांना वीज, पाणी अशा सर्व सुविधा पुरवल्या जात असून, अवैध पद्धतीने अतिक्रमणाची भाडेवसुली सुद्धा कोणीतरी करत असतानाही यावर कारवाई केली जात नसल्याचे जयश्री पितळे यांनी सांगितले आहे.

नुकतेच ९ जून रोजी अंधेरी आरटीओ अधिकाऱ्यांना यांसदर्भात लेखी तक्रार दिली आहे. तर वर्सोवा मतदार संघाच्या आमदार भारती तऱ्हेकर यांनाही तक्रार केली आहे. मात्र, अद्याप तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसून, बेकायदा झोपड्या, त्यांच्याकडून बेकायदा पद्धतीने गोळा करण्यात येणार्या कचऱ्याचे ढिगारे आणि अनधिकृतपणे थाटलेली दुकाने अजूनही तशीच उभी आहे. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व सोसायटीला दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचे जयश्री पितळे यांनी सांगितले आहे.

अतिक्रमणातील काही झोपड्या आरटीओने पाडल्या

करदाते असलेल्या कायदेशीर नागरी वस्तीला लाजवेल अशा सर्व सुविधा या अतिक्रमण करून बेकायदा धंदे करणाऱ्यांना या ठिकाणी मिळत आहे. यातील काही झोपड्या आरटीओ अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून पाडल्या असून, सुमारे ९० टक्के बेकायदा झोपड्या अजूनही तशाच उभ्या आहेत. याठिकाणी सध्यातरी नवीन वाहनाची तपासणी करण्याचे काम आरटीओ अधिकाऱ्यांकडून केले जाते.

पोलिसांच्या तपासात गंभीर बाबी उघड होतील

स्थानिक पोलीस प्रशासनाला सुद्धा वेळोवेळी तक्रारी केल्या आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या भागात चैनस्नचींगच्या गंभीर घटना नियमित घडत असून, या बेकायदा झोपड्यांची पोलिस प्रशासनाने कसून तपास केल्यास गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सुरक्षा भिंतीला लागून संपूर्ण अनधिकृत बांधकाम झाले आहे. त्याठिकाणी जुगार, अनधिकृतपणे गॅरेज, दारू पितात, शिवीगाळ करतात ही पूर्ण जागा अंधेरी आरटीओ प्रशासनाच्या मालकीची आहे. उद्या या जागेत कोणतीही गंभीर गुन्हा घडल्यास जबाबदार आरटीओ अधिकाऱ्याला पकडावे की नाही ? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.

यासर्व प्रकाराचा सोसायटीला त्रास आहे. रात्रभर बेकायदा पार्ट्या सुरू राहत असल्याने झोप लागत नाही. झोपड्यांचा कचरा इथेच टाकत असल्याने डंपिंग ग्राउंड सारखा वास येतो, रात्रीचे मद्य पिऊन जुगारी एकमेकांशी भांडत असतात. मध्यरात्री पर्यंत मोठमोठ्याने स्पीकर सुरू असतात. त्यामुळे मुलांचा अभ्यास होत नाही. याभागातील खिडकी सुद्धा आम्ही उघडू शकत नाही.

- संतोष जगताप, सचिव, वात्सल्य सोसायटी

अतिक्रमण
Mumbai Crime : विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून! आरोपी पती बंगालमधून अटकेत

आमच्या बिल्डिंगची पाण्याची टाकी याच सुरक्षा भीतीला लागून आहे. बेकायदा झोपड्यातील सांडपाणी पिण्याच्या पाण्यात जाण्याची शक्यता आहे. प्लॉट विकत घेऊन, शासनाला कर भरून आम्ही इथे राहायला आलो आहे. दुसरीकडे शासनाची जागा असताना त्यावर खुशाल अतिक्रमण होऊ दिले जाते. त्याच्यावर आरटीओ अधिकाऱ्यांवर जराही लक्ष नाही. गंभीर म्हणजे १६ ते २५ वयोगटातील यंग मुल - मुली इथे रात्री - अपरात्री कशासाठी येतात ? त्यामुळे या बेकायदा झोपडपट्टीत अवैध धंदे सुरू असल्याची भीती आहे.

- जयश्री पितळे, रहिवासी वात्सल्य सोसायटी

अतिक्रमण
Mumbai : 'महारेरा'मुळे न्यायिक प्रक्रियेतील घरांच्या किंमतीत घट! मँचेस्टरच्या संशोधकांचा अभ्यास

अंधेरी आरटीओ संदर्भातील आरटीओ च्या जागांवर अतिक्रमण करण्यासंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही. तक्रार असल्यास त्यावर सकारात्मक विचार होईल.

- विवेक भिमनवार, आयुक्त, राज्य परिवहन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.