मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बुधवारी दिवसभरात मुंबईत १३८१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईत एकूण रुग्णसंख्या ८७, ५१३ वर पोहोचली आहे. पण अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आर्थर रोड कारागृहातील कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांनी कोरोनावर मात केली आहे. कारागृहातील १८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १७७ कैद्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आर्थर रोड कारागृहात हे कोरोना व्हायरसची लागण झालेलं महाराष्ट्रातील पहिलं कारागृह होतं. ही संख्या झपाट्यानं वाढत गेली. त्यानंतर कारागृहात कडक निर्बंधाचं काटेकोर पालन केल्यामुळे परिस्थिती आता बदलली आहे.
१८१ पॉझिटिव्ह कैद्यांपैकी केवळ १ जण पॉझिटिव्ह आढळला असून बाकीचे अन्य बरे झालेत. तीन कैद्यांचे रिपोर्ट अद्याप यायचे असले तरी अन्य १७७ कैदी पूर्णपणे बरे झालेत. त्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेत. उर्वरित कैदी येत्या एका आठवड्यात पूर्णपणे बरे होऊन त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह येतील अशी अपेक्षा कारागृहातल्या अधिकाऱ्यांना आहे.
आर्थर रोड कारागृहांसह मुंबईतील सर्व कारागृहात लॉकडाऊनचं पालन करण्यात आलं. अद्याप एक कैदी अद्याप कोरोना पॉझिटिव्ह असून हे आमच्यासाठी चिंताजनक आहे. आम्ही कारागृहातील सर्व कैद्यांची ताबडतोब चाचणी केली आणि त्यापैकी १५८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. पण चाचणी केल्यानंतर २ ते ३ दिवसात रिपोर्ट आला. त्या काळात आम्ही या लोकांना वेगळे करू शकलो नाही आणि त्यानंतर आणखी काही जणांची चाचणी झाली आणि ही संख्या १८१ वर गेली, असं कारागृह महानिरीक्षक (आयजी) दीपक पांडे यांनी एएनआयला सांगितले.
आम्ही कैद्यांना कारागृहातच क्वांरटाईन केलं. कारागृहातच कैद्यांवर हायड्रोक्सिक्लोरोक्विन, मल्टीविटामिन आणि आयुर्वेद, होमिओपॅथी आणि निसर्गोपचारानुसार उपचार सुरु केले. या उपचारामुळे १५ दिवसातच १२० कैदी बरे झाले. मात्र आम्ही त्यानंतरही उपचार सुरु ठेवले आणि आता निकाल समाधानकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पांडे म्हणाले की, कारागृहातील २८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 26 जण बरे झाले असून त्यातील बहुतेकजण पुन्हा कामावर रुजू झालेत. सर्व कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले, असंही त्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.