Mumbai : तब्बल 777 किलो ड्रग्ज जप्त, 97 अटकेत; अमली पदार्थ विरोधी पथकाची वर्षभरातील कारवाई

Mumbai
Mumbai
Updated on

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने या वर्षात आतापर्यंत 25 कोटींहून अधिक किमतीचे 777 किलोग्राम ड्रग्ज जप्त केले असून या संदर्भात 97 आरोपींना अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 38 प्रमुख गुन्हेगार असून त्यांच्याकडून 19.11 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

Mumbai
Mumbai : मुंबई महापालिका शाळेत शिपाईची १७९७ पदे रिक्त! तात्काळ पदभरतीची मागणी

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थात प्रामुख्याने मेफेड्रोन( एम डी),हेरॉइन, सिरपच्या बाटल्या, एलएसडी, हायड्रोपोनिक विड, चरस आणि गांजाचा समावेश आहे

97 आरोपी अटकेत

अमली पदार्थ विरोधी पथकाने या वर्षी जून 18 पर्यंत 56 प्रकरणांमध्ये तब्बल 97 जणांना अटक केली आहे. तसेच अटक आरोपीकडून यावर्षी आतापर्यंत 25.40 कोटी रुपयांचे 777 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. यात एकट्या मेफेड्रोनची (एमडी) किंमत 15.93 कोटी रुपये होती. तर उर्वरित पदार्थांमध्ये सिरपच्या बाटल्या, एलएसडी, हायड्रोपोनिक विड, चरस आणि हेरॉइनचा सारख्या अमली पदार्थांचा समावेश होता

Mumbai
Pankaja-Dhananjay : भाऊ-बहिणीच्या नात्याचं नवं पर्व; पंकजांसाठी धनंजय मुंडे एक पाऊल मागे, भविष्यात...

अंमली पदार्थ वजन. किंमत

मेफेड्रोन (एम.डी.) 8 किलो 15.93 कोटी

कोडेन फॉस्फेट सिरप 6000 बॉटल्स 28.94 लाख

LSD 522 पेपर्स 52.20 लाख

हायड्रोपोनिक विड 280 ग्राम 28 लाख

चरस 2.24 किलो. 67.35 लाख

हेरॉईन 354 किलो. 1.42 कोटी

एकूण 19.11 कोटी

8 आफ्रिकन अटकेत

मागील सहा महिन्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरोपींमध्ये आठ आफ्रिकन नागरिकांचा समावेश आहे . सर्वात जास्त वांद्रे, माहीम, बीकेसी, अंधेरी, विक्रोळी आणि भायखळा यासह शहरातील विविध भागांतून प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आल्याचे पोलिसांकडून माहिती मिळत आहे.

या प्रकरणांच्या तपासात आरोपींचे गुजरात, बिहार, हैदराबाद, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील अमली पदार्थ पुरवठादारांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.