डोंबिवली - केडीएमसी हद्दीत पाणी पुरवठा प्रकल्पांची कामे सुरु आहे. त्यासाठी मागविल्या जाणाऱ्या पाईपची देखरेख करण्यासाठी महापालिकेन सूरक्षा रक्षक नेमलेले नाहीत. त्यामुळे शहाड येथील जलकुंभानजीक ठेवलेले तीन टनाचे तीन पाईप चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला.
मोहने शहाड रोडनजीक जलकुंभाच्या जवळ मोठे पाण्याचे पाईप ठेवले आहेत. हे पाईप दोन ट्रकमध्ये एक क्रेनच्या सहाय्याने भरुन नेत असल्याचा प्रकार जवळच्या नागरीकांच्या लक्षात आला. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवित हा चोरीचा प्रकार असू शकतो अशी शंखा व्यक्त करत या बाबत पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच खडकपाडा पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील आणि पोलिस निरिक्षक शरद झिने यांनी चौकशी सुरु करत ट्रकमध्ये पाईप भरुन नेत असलेल्या ट्रक चालकासह क्रेन चालकाला पोलिसांनी विचारणा करत याची माहिती महानगरपालिकेला दिली.
त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. महानगरपालिकेने याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून खडकपाडा पोलीस या तिन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढचा तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.