Mumbai : एटीएसच्या कार्यालयातून पळालेल्या बांगलादेशी नागरिकाना अटक

अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजू अबुल हाषिम शेख असे आरोपीचे नाव असून तो बांगलादेशाचा नागरिक आहे.
Mumbai news
Mumbai newsesakal
Updated on

मुंबई : काळाचौकी मधील राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयातील शौचालयाच्या भिंतीवरून उडी मारून पळालेल्या बांगलादेशी नागरिकाला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. भारतात बेकायदेशिररित्या वास्तव्य केल्याप्रकरणी आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजू अबुल हाषिम शेख असे आरोपीचे नाव असून तो बांगलादेशाचा नागरिक आहे.

Mumbai news
Career Tips : नवीन वर्षात घरी बसून करा ‘हे’ कोर्स आणि वाढवा तुमचे उत्पन्न

अवैध मार्गाने प्रवेश

एटीएसने फसवणुकीसह अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजू अबुल हाषिम शेखला 8 डिसेंबर 2022 रोजी अटक केली होती. 6 मार्च रोजी त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान आरोपीने गुन्हाही कबूल केला होता.त्याला 29 सप्टेंबर 2023 रोजी 10 महिन्यांची शिक्षा आणि 500 रुपये दंड ठोठावण्यात आला होता. निकालामध्ये आरोपीचे प्रत्यार्पण करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, प्रादेशिक परकीय नागरिक नोंदणी अधिकारी, तसेच पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा गुन्हे शाखेच्या कार्यालयाशी पत्र व्यवहार करण्यात आला होता.

Mumbai news
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

पोलिसांच्या हातावर तुरी

आरोपीने शिक्षा पूर्ण भोगल्यानंतर त्याला 1 नोव्हेंबर रोजी एटीएसच्या काळाचौकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. तेथे तो पोलिसांच्या देखरेखीखाली खाली होता. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.45 च्या सुमारास अंघोळीचे निमित्त करून तो प्रसाधनगृहात गेला. कपडे धुण्याचे निमित्त करून तो पुन्हा आतमध्ये गेला. त्यानंतर 7.30 ते 7.45 च्या सुमारास आरोपी दिसत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी प्रसाधनगृहात शोध घेतला. त्यावेळी आरोपी भिंतीवर चढून उडी मारून पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पोलिसांचा शोध

आरोपी पळून गेल्याने खळबळ उडाली. पोलीस पथकाने काळाचौकीसह कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक, शिवडी रेल्वे स्थानक, सीएसएमटी रेल्वे स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस व टिळक नगर रेल्वे स्थानक, वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. अखेर आरोपी विक्रोळी परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपी शेखला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.