बॅंक ऑफ बडोदा
बॅंक ऑफ बडोदाGallery

बँकांचे नियम बदलणार; सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री

बँकेतून जास्तवेळा पैसे काढल्यास भुर्दंड
Published on

मुंबई : दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून काही बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार असून जास्त वेळा पैसे काढल्यास ग्राहकांना भुर्दंड बसेल. गॅसच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडरचे बुकिंग करण्यासाठी आता ‘ओटीपी’ अनिवार्य असेल.

एक नोव्हेंबरपासून काही बँकांमधून विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पैसे भरण्यावर किंवा काढण्यावर निर्बंध येतील. ठरल्यापेक्षा जास्त व्यवहार केल्यास त्यावर शुल्क आकारले जाईल. बचत खात्यामध्ये एका महिन्यात तीनवेळा पैसे भरता येतील, त्यानंतर प्रत्येक वेळी ४० रुपये द्यावे लागतील. बँक ऑफ बडोदापासून याची सुरुवात होईल. त्यात महिन्यातून चारवेळा (एटीएमसह) निःशुल्क पैसे काढता येतील. ‘बँक ऑफ बडोदा’च्या वेबसाईटवर देखील ही माहिती देण्यात आली आहे. फक्त जनधन खात्यावरील हे शुल्क द्यावे लागणार नाही. कर्ज खात्यावरही जादा शुल्क द्यावे लागेल.

बॅंक ऑफ बडोदा
उमदी : भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

गॅस सिलिंडर बुक करण्यासाठीदेखील आता ‘ओटीपी’ची गरज भासेल. सिलिंडरसाठी मागणी नोंदविल्यावर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’ येईल नंतर सिलिंडर घेऊन येणाऱ्याला तो ‘ओटीपी’ सांगितल्यावरच भरलेली टाकी मिळेल. त्यामुळे चुकीचा पत्ता व चुकीचा मोबाईल क्रमांक देणाऱ्या ग्राहकांची चांगलीच पंचाईत होईल. यापूर्वीच गॅस कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आपला पत्ता, मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यास सांगितले होते. दरमहा सिलिंडरच्या किमतीतही बदल होत असतो, त्यानुसार आता एक नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीही बदलतील. यामुळे सणासुदीच्या दिवसात ग्राहकांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.

रेल्वे वेळापत्रकात बदल
मंगळवारपासून रेल्वेच्या देशभरातील वेळापत्रकात बदल होणार आहे. याची सूचना रेल्वेने आधीच दिली होती. हे बदल एक ऑक्टोबरपासून नियोजित होते. मात्र नंतर हे बदल महिनाभर विलंबाने करण्याचे ठरविण्यात आले. देशातील विविध शहरे जोडणाऱ्या तीस राजधानी एक्स्प्रेस
व तेरा हजार पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक बदलेल. नोव्हेंबर महिन्यापासून शाळा-महाविद्यालयेही सुरु होणार आहेत. दिल्लीत एक नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील, तर महाराष्ट्रातही पंधरा नोव्हेंबरपासून शाळा व महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.