मुंबई : बार्टी देणार ९० हजार विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण

राज्यात 30 प्रशिक्षण केंद्रावर विद्यावेतनासोबत इतरही सुविधा
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीच्या तब्बल ९० हजार तरुण, तरुणींना पुढील पाच वर्षांत बँकिंग, रेल्वे, एलआयसी,पोलिस व मिलिटरी भरती यासोबत ॲप्टीट्युट टेस्टवर आधारीत खाजगी व कार्पोरेट क्षेत्रातील महत्वाच्या नोकऱ्यांसाठी पूर्वतयारीसाठी आवश्यक असलेलयानोकरी आणि व्यवसायाला पूरक असे प्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत(बार्टी) दिले जाणार आहे.

यासाठी सामाजिक न्याय विभागाने जीआर जारी केला आहे. पहिल्या वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजनही केले जाणार आहे. या प्रशिक्षणाची राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि परिसरात नीट अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाने बार्टीवर सोपण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बार्टीकडून राज्यभरातील तब्बल ३० प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Mumbai
धमकी पत्रानंतरही एकनाथ शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर जाणार

या प्रशिक्षणात बारावी उत्तीर्ण, पदवी, पदव्युत्तर तरुणांसाठी बँकिंग, रेल्वे, एलआयसी,  इत्यादि परीक्षांचे प्रशिक्षण हे ६ महिने कालावधीचे दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रती महिना रुपये ६ हजार इतके विद्यावेतन (स्टायपंड) दिले जाणार आहे. तर पोलिस व मिलिटरी भरती चे प्रशिक्षण हे ४ महिन्याचे असून त्यात ६ हजार रूपयांचे मानधन असेल. तर पोलिस व मिलिटरी भारतीच्या विद्यार्थ्यांना यासोबतच बूट व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता प्रति विद्यार्थी ३ हजार रूपये दिले जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. प्रत्येक वर्षी १८ हजार प्रमाणे पुढील पाच वर्षांत ९० हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळणार असल्याने यातून हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()