डोंबिवली - ठाणे जिल्ह्याला प्रतिक्षा लागून राहीलेले बारवी धरण अखेर दुपारी पूर्ण क्षमतेने भरले. धरणावरील आठ स्वयंचलित दरवाजे दुपारी उघडले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने जिल्ह्याची पाण्याची चिंता आता वर्षभरासाठी मिटली आहे. पावसाचा जोर सध्या या भागात नसला तरी ही धरणातील पाण्याच्या पातळीत होणारी वाढ पहाता धरणा शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बदलापूर येथील बारवी धरण मंगळवारी दुपारी 100 टक्के भरले. अंबरनाथ आणि बदलापूर तालुक्याच्या मध्यावर हे धरण असून या धरणातून स्थानिक प्राधिकरण व औद्योगिक विभागास पाणी पुरवठा केला जातो.
धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर पाणी साठवण क्षमता हि दुपट्टीने वाढली आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाई गेल्या तीन वर्षात ठाणे जिल्ह्याला जाणवली नाही.
परंतू यंदा पाऊस लांबल्याने काही प्रमाणात पाणी टंचाईचा सामना प्रथमच करावा लागला होता. जुलै महिन्यात ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसास सुरुवात झाली. धरण परिसरात देखील
समाधान कारक पाऊस सुरु झाल्याने पाणी कपातीचे मळभ जिल्ह्यावरुन हटले. यानंतर सारे जण बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची वाट पहात होते.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील बारवी धरण भरण्याची शक्यता एमआयडीसी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. अखेर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी बारवी धरण भरले आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याला एक दिलासा मिळाला.
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मंगळवारी दुपारी बारा वाजता च्या दरम्यान धरणातील 11 पैकी आठ स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत.
धरणामध्ये पाण्याची पातळी 72.60 मीटर एवढी आल्यास धरणाचे संचलित दरवाजे उघडले जातात. दुपारी बाराच्या दरम्यान धरणाने आपल्या क्षमतेची पातळी गाठल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
बारवी धरण भरल्याने अंबरनाथ उल्हासनगर कल्याण ठाणे भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी यांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गील निघाला आहे. सध्य स्थितीत धरणात 342 एमसीएम एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.