मुंबई : मुंबईचा बदल जवळून पाहिलेली बेस्टची डबल-डेकर बस आजपासून सेवेतून निवृत्त होत आहे. या बसने मुंबईच्या अगदी सुरूवातीच्या काळापासून आत्ताच्या आधुनिक काळापर्यंतचा काळ जवळून अनुभवला आहे. ही नॉन एसी बस आपला शेवटचा प्रवास करण्यासाठी आज सकाळी मरोळ आगारातून सुटली. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अधिक माहितीनुसार, वाढती ट्राफिक लक्षात घेता, मुंबईकरांच्या सेवेत साधारण 1937 पासून डबल डेकर बस सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सलग आठ दशके मुंबईकरांच्या सेवेत या बस सुरू होत्या. त्याचबरोबर 1900 दशकाच्या सुरूवातील पर्यटकांना पर्यटनासाठी वापरण्यात येणाऱ्या ओपन रूफ डबल डेकर बसही येणाऱ्या 5 ऑक्टोबरपासून सेवेतून काढून घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, "बेस्टच्या ताफ्यात सध्या ३ ओपन डेक बसेससह 7 डबल-डेकर बस उरल्या आहेत. ही वाहने त्यांच्या लाइफची 15 वर्षे पूर्ण करत असल्याने, आजपासून डबल-डेकर बस कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत, तर ओपन-डेक बसेस 5 ऑक्टोबर रोजी सेवेतून बंद केल्या जातील.” असं स्पष्टीकरण बेस्टकडून देण्यात आलं आहे.
मुंबईच्या बदलांची साक्षीदार
मुंबईकरांसाठी स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू करण्यात आलेली डबल डेकर बस ही इतिहासाची साक्षीदार राहिली आहे. स्वातंत्र्याचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल, आणिबाणी, महापूर असे अनेक घटना डबल डेकर बसने पाहिल्या आहेत. या बस आता मुंबईकरांच्या सेवेतून कायमच्या निवृत्त होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.