Best Bus Strike: 'तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा...';बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून नोटीस

Mumbai Best employee compony notice : पगारवाढ आणि सुविधा मिळत नसल्याने बेस्टचे कर्मचारी 2 तारखेपासून संपावर आहेत. अचानक पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहयला मिळतंय.
BEST WORKER
BEST WORKERsakal media
Updated on

Mumbai Best employee compony notice :

मुंबई- पगारवाढ आणि सुविधा मिळत नसल्याने बेस्टचे कर्मचारी 2 तारखेपासून संपावर आहेत. अचानक पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहयला मिळतंय. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसतानाच त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांना केलेल्या संपामुळे कंपन्यांकडून नोटीस मिळाली आहे. तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा या नोटीस मधून देण्यात आलाय. त्यामुळे बेस्ट कर्मचारी या नोटिशीला कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे.

BEST WORKER
Rahul Gandhi Breaking: अखेर खासदारकी बहाल! उद्या मोदी-राहुल गांधी आमनेसामने

बेस्टमध्ये कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी पुरवठा करणाऱ्या एसएमटी एटीपीएल असोसिएट कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावलीय. आपण केलेल्या संपामुळे बेस्ट प्रशासन आणि कंपनीची प्रतिमा मलीन झालीय. दोन तारखेपासून बेस्ट डेपोतून बाहेर न पडल्याने नियते रद्द झाली आहेत. तसेच बेस्टने प्रवास करणाऱ्या हजारो लोकांचे हाल होत आहेत. बेस्टचे उत्पन्न बुडाले आहे. बेस्ट व्यवस्थापनाने कंपनीला नोटीस पाठवली असून कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कंपनीच्या बस कंत्राटावर विपरित परिणाम पडू शकतो. यास सर्वस्वी आपण जबाबदार आहात, असे पत्र कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवले आहे.

Best employee compony notice
Best employee compony noticeESAKAL

कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांना सध्या मिळणारे १६ हजार वेतन वाढवून ते २५ हजार करण्यात यावे ही मागणी अनेक दिवसांपासून रखडली आहे. त्यांची ग्रॅच्युएटी तसेच इतर सुविधा बेस्ट कडून मिळत नाहीयेत. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सामूहिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सकाळी कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. सलग सहाव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुंय.

बेस्ट कर्मचाऱ्यांना मागण्याबद्दल महापालिकेने सकारात्मक चर्चा केली पाहिजे. युनियनच्या लोकांनाही विनंती करेन की मुंबईकरांची अडवणूक करु नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलीये. त्यामुळे बेस्ट कर्मचारी काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.