Mumbai : कच-यापासून बायोगॅस आणि खतनिर्मिती

महालक्ष्मी गोराई केंद्रावर प्रक्रिया
Mumbai news
Mumbai newsesakal
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेने कचरा मुक्त मुंबईसाठी महालक्ष्मी, गोराई या केंद्रावर कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया, बायोगॅस अन् खत निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांवरून डंपिंग ग्राऊंडवर जाणार्‍या कचर्‍याचे प्रमाण कमी होणार असून दुर्गंधीसारख्या समस्याही कमी होण्यास मदत होईल असा विश्वास पालिका प्रशासनाला आहे.

Mumbai news
Women Health Tips : सिझेरियनच्या टाक्यांमध्ये इन्फेक्शन पसरलंय हे कसं ओळखावं? त्यावर काय उपाय करावे?

कचरा मुक्त मुंबईसाठी पालिकेने २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचर्‍याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणार्‍या इमारती-आस्थापनांना ओल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच २०३० पर्यंत कचरा मुक्त मुंबई हे उद्दीष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे.

Mumbai news
Career Tips : नवीन वर्षात घरी बसून करा ‘हे’ कोर्स आणि वाढवा तुमचे उत्पन्न

या पार्श्वभूमीवर आता महालक्ष्मी आणि गोराई कचरा स्थानांतरण केंद्रावर अद्ययावत पद्धतीने कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. महालक्ष्मी येथे दररोज महालक्ष्मी केंद्रावर दररोज ६२५ मेट्रिक टन तर गोराई ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

Mumbai news
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

मुंबईतील ६ हजार मेट्रिक टनांच्या कचर्‍यापैकी सुमारे २ हजार मेट्रिक टन कचरा हा सहा ठिकाणी असणार्‍या कचरा हस्तांतरण केंद्रांवर छोट्या वाहनांमधून जमा केला जातो. यानंतर मोठ्या वाहनांमधून डंपिंग ग्राऊंडवर नेऊन विल्हेवाट लावली जाते. मात्र वर्सोवा, गोराई, कुर्ला आणि महालक्ष्मी येथे असणार्‍या कचरा हस्तांतरण केंद्रांच्या ठिकाणी जमा होणार्‍या कचर्‍यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. शिवाय रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या ठिकाणी कचरा पुनप्रक्रिया करणारी ‘आदर्श कचरा हस्तांतरण केंद्र’ बनवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दुर्गंधी कमी होणार

हस्तांतरण केंद्रावर सुका कचरा, ओला कचरा असे विलगीकरण होईल. यानंतर प्लास्टिकच्या कचर्‍यापासून पायरोलेसिस तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून इंधन ऑइल तयार होणार आहे. शिवाय टाइल्स, पेव्हर ब्लॉक, विटा अशा वस्तू बनवल्या जातील. ओल्या कचर्‍यापासून खत आणि बायोगॅस प्रकल्प उभारले जातील. ही सर्व कामे कचरा हस्तांतरण केंद्र बंदिस्त करून केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी, रोगराईचा धोका टळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.