Mumbai : मुलाने वाढदिवसाला दिलेली भेट हरवली, एनएमएमटी वाहकाने वृद्धेला हरवलेले कर्णफूल केले परत

डोंबिवलीकर सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर आपल्या कुटुंबीयांसह मंगळवारी नवी मुंबईतील सीबीडी येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेेले होते.
mumbai
mumbaisakal
Updated on

Mumbai - मुलाने आईला तिच्या 75 व्या वाढदिवसाला सोन्याचे कानातले गिफ्ट दिले. मुलाने प्रेमाने दिलेली भेट म्हणून आईने देखील ते लगेच कानात घातले. नवी मुंबईतून डोंबिवलीला बसने प्रवास करत असताना हे कानातले पडले.

घरी आल्यावर कानातले हरविल्याची बाब कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ एनएमएमटी प्रशासन आणि बस वाहका शी संपर्क साधला. बस वाहकाला गाडीत ते कर्णफूल मिळाले होते, त्याने प्रामाणिक पणा दाखवित निंबाळकर कुटूंबाला सोन्याचे कानातले परत केले. श्यामराव म्हस्के असे या वाहकाचे नाव असून त्यांचे डोंबिवलीकरांनी कौतुक केले आहे.

mumbai
Pune : खळबळजनक! शुक्रवार पेठेतील सदनिकेत आढळले दांपत्याचे मृतदेह

डोंबिवलीकर सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर आपल्या कुटुंबीयांसह मंगळवारी नवी मुंबईतील सीबीडी येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेेले होते. संध्याकाळी नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसने निंबाळकर कुटुंबीय डोंबिवलीच्या दिशेने परतीचा प्रवास करत होते.

तुर्भे येथे आल्यानंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे निंबाळकर कुटुंबीय त्या बसमधून उतरले. एनएमएमटीची दुसरी बस पकडून ते डोंबिवलीत परतले.

निंबाळकर कुटुंबीय डोंबिवलीत घरी गेल्यानंतर महेश यांच्या आई मालती यांनी आपल्या कानातील सोन्याचे कर्णफूल बसमध्ये पडल्याचे सांगितले. आई मालती यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुलगा महेश आणि त्यांची बहिण शुभांगी मगर पाटील या दोघा भावंडांनी आपल्या आईला कर्णफूल भेट दिले होते.

mumbai
Mumbai : अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन मार्गिका ऑक्टोबरअखेर सुरू होणार

त्यामुळे त्या कर्णफूलाला अनन्य साधारण महत्व असल्याने मुलगा महेश यांनी तात्काळ पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर बस स्टॉपवर जाऊन एनएमएमटीच्या त्या बसमध्ये शोध घेतला. मात्र आईचे हरवलेले कर्णफूल काही सापडले नाही. तुर्भे येथे बंद पडलेल्या बसमध्ये कर्णफूल पडले असेल तर ते पाहण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्याला निरोप देतो, असे बसवाहक श्यामराव म्हस्के यांनी सांगितले.

वाहक श्यामराव यांनी तुर्भे बसवर असलेल्या वाहकाला बसमध्ये पडलेल्या सोन्याचे कर्णफूलाचा शोध घेण्यास सांगितले. वाहकाने शोध घेतल्यानंतर एका आसनाखाली कर्णफूल पडल्याचे दिसले. त्या वाहकाने तातडीने ही माहिती देताच वाहक श्यामराव यांनी महेश निंबाळकर यांना कळविले.

कर्णफूल आमच्याकडे सुरक्षित असल्याचा निरोप वाहक श्यामराव यांनी दिला. दुसऱ्या दिवशी महेश यांना वाहक म्हस्के यांनी बसमध्ये हरविलेले सोन्याचे कर्णफूल परत केले. महेश निंबाळकर यांच्यासह त्यांच्या वृध्द आई मालती यांनी एनएमएमटीच्या दोन्ही वाहकांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.