Mumbai : धावत्या लोकलमध्ये विनयभंगाच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांनी घेतली रेल्वे व्यवस्थापकांची भेट!

रात्री ९ ते संध्याकाळी ६ यावेळेत महिला डब्ब्यात पोलिस सुरक्षा असायलाच हवी होती.
Mumbai
Mumbaisakal
Updated on

Mumbai - धावत्या लोकलमध्ये एका तरूणाने २४ वर्षीय तरूणीच्या विनयभंगाच्या घटनेतर भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक निरज वर्मा यांची शुक्रवारी (ता.३० ) प्रत्येक्ष भेट घेतली आहे. सरकारने महिला मुलींच्या सुरक्षेसाठी बनविलेल्या नियमाची अंमलबजावणी करण्यात व आपल्या कर्तव्यात ज्या अधिकाऱ्याने कसूर केली आहे, त्याच्यावर नियमानुसार तात्काळ कारवाई मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Mumbai
Mumbai News : मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यावर रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा उतारा

रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाडहून एक महिला चर्नी रोडला येत असताना मुंबई सेंट्रल ते ग्रॅंटरोडच्या दरम्यान एका तरुणाने चालत्या ट्रेनमध्ये चढून तिच्याशी लगट करायचा प्रयत्न केला. पण तिने आरडाओरडा केल्यानंतर तो समोर उभ्या असलेल्या गाडीत उडी मारून पळून गेला. २४ तारखेची ही घटना आहे.

आरोपीविरोधात २८ तारखेला गुन्हयाची नोंदविला गेल्यानंतर पोलिसांनी तिथले सीसीटीव्ही तपासले असता त्याचा चेहरा त्यात दिसला असून त्याला पकडण्यासाठी आरपीएफ व जीआरपी यांच्या पथक कामाला लागल्या आहेत. विशेष म्हणजे रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत प्रत्येक महिला डब्ब्यात पोलिस असले पाहिजे,

Mumbai
Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

या नियमाचे पालन न झाल्याने ही घटना समोर आली. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी रात्री ९ ते संध्याकाळी ६ यावेळेत महिला डब्ब्यात पोलिस सुरक्षा असायलाच हवी होती. ती का नव्हती लोहमार्ग पोलीस आयुक्त यांचे उत्तर द्यावेत. सरकारने महिला मुलींच्या सुरक्षेसाठी बनविलेल्या नियमाची अंमलबजावणी करण्यात व आपल्या कर्तव्यात ज्या अधिकाऱ्याने कसूर केली आहे, त्याच्यावर नियमानुसार तात्काळ कारवाई झालीच पाहिजे ही आमची आग्रही भूमिका असल्याची माहिती भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे.

आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही-

महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध आहे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे अशा घटनांचेही राजकारण करतात त्यांना मात्र मला ठणकावून एक गोष्ट सांगायची आहे, महिला अत्याचाराच्या घटना या आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही तर समाजाच्या जबाबदारीचा विषय आहे आणि ही जबाबदारी आम्हाला फार चांगल्या पद्धतीने कळते. त्यामुळे दोषींवर कारवाई होईल असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.