Mumbai : ठाणे लोकसभेसाठी भाजप - राष्ट्रवादी आग्रही; भाजप प्रदेश अध्यक्ष शिवसेनेचा उल्लेख करण्यास विसरले ? की हे वेगळेच संकेत...

केला जात असला तरी भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांनी मात्र ही एक वेगळेच संकेत दिले आहेत.
chandrshekar bawnkule
chandrshekar bawnkule sakal
Updated on

डोंबिवली - ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेत शिंदे व ठाकरे असे दोन गट पडले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या बालेकिल्ल्यात वर्चस्व आहे. ठाकरे गट देखील येथे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असताना भाजप मात्र ही जागा आपल्याकडे यासाठी जोर लावत आहे. शिंदे गटाकडून किती ही या जागेवर दावा

केला जात असला तरी भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांनी मात्र ही एक वेगळेच संकेत दिले आहेत. याठिकाणी भाजप, राष्ट्रवादी प्रयत्न करत आहे. जागा कोणालाही मिळू दे शेवटी लढायचं आहे असे सांगताना ते शिवसेनेचा उल्लेख करायचे मात्र विसरले आहेत. आता ते विसरले की ही जागा सेना भाजपला सोडणार याविषयी चर्चा रंगल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दोऱ्यावर आले आहेत. शनिवारी त्यांनी कल्याण, शहापूर आणि मुरबाड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. कल्याण पश्चिमेला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

chandrshekar bawnkule
Mumbai Pollution: मुंबईकरांनो काळजी घ्या ; प्रदूषणामुळे वाढत आहे 'या' आजारांची संख्या

यावेळी ठाणे लोकसभेसाठी भाजप आग्रही आहे याविषयी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे म्हणाले, ठाणे लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही लोकसभा आम्हाला मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. इथे मागणी राहणारच आहे. कारण भाजपला वाटतं की आम्हाला मिळावं, राष्ट्रवादीला वाटतं अजित दादांना मिळाली पाहिजे. शेवटी ज्याला जी मिळेल शेवटी जिंकायच आहे. आणि जिंकायचा आहे 45 प्लस घेऊन. त्यामुळे ज्याला जे मिळेल तिथे भाजपा 51% ची लढाई लढेल असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

chandrshekar bawnkule
Mumbai News : कचखाऊ धोरणामुळे हिरे उद्योग सुरतला; सुप्रिया सुळे यांचा आरोप, उदय सामंत यांच्याकडून इन्कार

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे शिवसेनेचे सध्याचे ठाकरे गटाचे राजन विचारे हे खासदार आहेत. ही जागा भाजपला मिळावी यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मागणी करत आहेत. त्यातच मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याचे असून ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचे वर्चस्व अधिक असल्याने ही जागा ठाकरे गट जिंकू नये हा गड आपल्याच ताब्यात असावा यासाठी ताकद लावत आहे.

chandrshekar bawnkule
Mumbai Pollution: आदित्य ठाकरेंमुळेच वाढलय मुंबईचे प्रदूषण; आशिष शेलारांचा आरोप

असे असताना भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी मात्र वेगळेच संकेत दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी आग्रही कोण आहेत हे सांगताना त्यांनी भाजप व राष्ट्रवादीचा उल्लेख केला मात्र शिवसेना शिंदे गटाचा उल्लेख त्यांनी यावेळी केला नाही.बावनकुळे हे उल्लेख करण्यास विसरले की मुद्दाम त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला नाही. ही जागा भाजप किंवा राष्ट्रवादी ला देऊन कल्याण लोकसभा शिवसेना शिंदे गटासाठी सोडली जाणार का ? याच्या एकच चर्चा आता रंगल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.