Mumbai: खासदार शिंदेंचे दुर्लक्ष?, कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप नाराज

विकासकामांचे निधी मिळत नसल्याने थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या भागात लक्ष देत नाही.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचे सूत काही केल्या जुळत नाही आहे. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड व शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद ताजा असतानाच आता भाजपच्या माजी लोकप्रतिनिधीनी देखील शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली आहे.

Mumbai
Mumbai Theft : लॉकर फोडायला गेले अन् कटरचाच संपला गॅस ; चोरट्यांच्या हाती मोजकाच मुद्देमाल !

विकासकामांचे निधी मिळत नसल्याने थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या भागात लक्ष देत नाही. आमदार विकास कामासाठी निधी देत आहेत पण खासदार देत नाही असे थेट माजी उप महापौर व नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी सांगितले आहे.

यामुळे भाजप शिंदे गटाचे सूत काही केल्या जुळत नसून मनसे सोबत मात्र भाजपची जवळीक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप आणि शिंदे गटात सारे काही आलबेल असल्याचा किती ही प्रयत्न वरिष्ठ करत असले तरी स्थानिक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र जुळवून घेताना दिसत नाही.

Mumbai
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

भाजप आमदार गणपत गायकवाड व शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला की दोन्ही पदाधिकारी आपापले समर्थक घेऊन रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले आहे. हा वाद क्षमत नाही तोच आता भाजपच्या माजी लोक प्रतिनिधींनी देखील शिंदे गटावर नाराजी उघड केली आहे.

पिसवली प्रभाग क्र. 107 अमरदिप कॅालनी येथील अमरदिप मुख्य नाला ते साई सुमन बिल्डींग पॅन्थर्स स्कूल ते श्री कॅालनी या रस्त्याची फार दुरावस्था झाली होती. या रस्त्याचा वापर शाळेतील विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या प्रमाणात करत होते.

सदर रस्त्यासाठी भाजपचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी महापालिका स्तरावर बराच पाठपुरावा केला होता, मात्र निधी मिळाला नाही. शेवटी कल्याण ग्रामिणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आमदार यांनी निधी मिळाला. यानंतर मोरेश्वर भोईर यांनी मानतील खंत मांडली...

भोईर म्हणाले, मनसे आमदार राजू पाटील यांच्या कडून माझ्या प्रभागात मागील काळामध्ये निधी मिळाला आहे. आता परवा एका रस्त्याचे भूमिपूजन केलं आणि पुन्हा 25 लाखाच्या निविदा आमच्या प्रभागामध्ये निघालल्या आहेत.

Mumbai
Pune Crime : जुगार खेळण्यासाठी घरफोडी, चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत

त्याचा वर्क ऑर्डर सुद्धा झालेले आहे आणि त्याचं लवकरच आम्ही भूमिपूजन करून कामाला सुरुवात करणार आहोत. मागील तीन वर्षापासून महानगरपालिकेत प्रशासक आहे. आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी निर्भर आहोत आमदार फंड आणि खासदार फंड वर.

परंतु दुर्दैवाने खासदार या भागाकडे लक्ष देत नाहीत, विकासकामांसाठी निधी देत नाहीत. त्यांचे लक्ष आहे परंतु केवळ त्यांच्या लोकांकडे.

आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे आमदारांचा जो निधी आम्हाला मिळतोय, त्याचे आम्ही कौतुक केलंच पाहिजे. निश्चितपणे त्याबद्दल काही वादच नाहीये.

दरम्यान माजी उपमहापौर भोईर यांनी मनसे आमदार यांचे कौतुक केले आहे, तर दुसरीकडे खासदार निधी देत नसल्याची खंत मांडली आहे, त्यामुळे आता विकास निधीवरून सत्ताधारी शिवसेना-भाजप मध्ये विकासनिधीवरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

भाजपच्या बॅनरवर मनसे आमदार यांचा फोटो आणि वाढती जवळीक...

कल्याण मधील पिसवली गावात भाजपच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो झळकळयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांमध्ये सुद्धा भाजपच्या बॅनरवर मनसे आमदार यांचा फोटो लावण्यात आला होता.

तर भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांचे बॅनर व्हायरल झाले होते. या बॅनरमध्ये त्यांनी भाजपचे कॅबिनेट मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले होते.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात भोपर-देसलेपाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांचे या बॅनरमधून आभार मानण्यात आले होते.दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानत ट्विट सुद्धा केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.