यंदाच्या दिवाळी फटाक्यांना नियमांचे ग्रहण, फटाक्यांचा बार फुसका

यंदाच्या दिवाळी फटाक्यांना नियमांचे ग्रहण, फटाक्यांचा बार फुसका
Updated on

मुंबईः देशभरात दिपोत्सव सुरु आहे. यंदाच्या दिवाळीत मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई महानगर पालिकेनं मोठ्या आवाजाच्या आणि धुर करणाऱ्या फटाके विक्रीवर बंदी घातल्याने दरवर्षी कोट्यवधींचा होणारा व्यवसाय यंदा मात्र 30 ते 40 टक्क्या वरच राहिल्याचे मोहम्मद अली रोड, यूसुफ मेहरअली (YM रोड) रोड येथील होलसेलर्स, रिटेलर्स व्यापारी सांगतात.

यंदा नेमके काय घडले ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 7-8 महिने देशभरात लॉकडाऊन होता. त्यामुळे शिवकाशी निर्मित फटाका मालावर निर्बंध आले. येथे माल हाताने तयार होतो. फॅक्टरीतून माल डायरेक्ट उचलणाऱ्या मोठ्या व्यापारांची अडचण निर्माण झाली ती आगावू पैसे भरून मालाची बुकिंग करणाऱ्या किरकोळ, छोट्या दुकानदार यांच्या कडून जमा झालेल्या रकमेच्या परताव्याची कारण त्यांनी पालिकेच्या निर्बंधामुळे छोटी छोटी दुकाने थाटलीच नाहीत. हवातसा माल घेतलाच नाही. त्यामुळे बराच माल गोडाऊनला परत पाठविला.
 
गणेश आगमन विसर्जन ,नवरात्री उत्सव, दसरा, लग्न सिझन,सभा, संमेलने यात फटाक्यांना चांगला उठाव असतो. पण यंदा हीच मागणी घटली आहे. त्यामुळे व्यवसायात घट झाली.

शिवकाशी आणि अन्य ठिकाणी असलेल्या फॅक्टरीमधील फटाकेमाल मुंबई बाहेरील गोडाऊनमध्ये ठेवावा लागतो. त्यांचे वर्षाचे भाडे फिक्स असते. तेथे माल परत पाठविला गेला.

आता मात्र मर्यादित आणि हलक्या  आवाजाचे, कमी धुराचे तसेच प्रदूषण कमी करणारे फटाके मुंबईत विक्रिस आहेत.

दुकानाबाहेर असलेल्या मुंबई फटाके विक्रेते असोसिएशनने नोटिस लावली असून शनिवारी सायंकाळी केवळ हलकी फटाके फोडण्यास मर्यादित तासांसाठी परवानगी देण्यात आली होती. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वरील आदेशाच्या संदर्भात आम्ही आदेशानुसार परवानगी असलेल्या वस्तूशिवाय इतर कोणत्याही वस्तूंची विक्री आम्ही करीत नाही, असेही व्यापारी सांगत आहेत. अगदी हलक्या आवाजाचे  क्रॅकर्स - स्पार्कलर्स, फ्लावरपॉट्स, व्हीलल्स आणि श्रेणींमध्ये  सौम्य बॉम्ब - विविध प्रकारचे 'विशाल,' सुपर ',' स्पेशल, 'डिलक्स' आणि 'स्टँडर्ड' उपलब्ध आहेत.

फटाका विक्री संदर्भात मुंबई महानगर पालिकेने आदेश काढल्यानंतर बी विभाग कार्यालयातील अनुज्ञापन वरिष्ठ निरिक्षक रमेशकुमार सिंह यांनी इसाभाई फायर वर्क्स येथे सहकारी अधिकाऱ्यांसह जाऊन फटाक्यांची तपासणी केली होती. पण व्यापाऱ्यांकडे सौम्य आवाजाचे फटाके असल्याने त्यांनी निःश्वास सोडला होता. सरकारचे आदेश पाळले जात असल्याबददल त्यांनी व्यापारी वर्गाचे आभार मानले होते.

ग्राहकांना काय वाटते?

फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे साखरेविना मिठाई नाही का? अहो मिठाईत साखरच नसेल तर त्याचा गोडवा आणि मिट्ठास कसा बरे येईल? दिवाळी म्हणजे सणांचा राजा. दिपोत्सवात वाजणारे धमाकेदार फटाके असे साधे सरळ समीकरण असल्याचे सिद्धेश आणि मंगेश गायकवाड हे दोन्ही भाऊ हास्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.

अॅड. सुमीत तांबे म्हणतात की, सरकारचे आदेश मानावे लागतील प्रदूषणमुक्त दिवाळी करायला हवी. सौम्य आवाजाचे फटाके वाजवायला हरकत नाही. दिव्यांचा वार्षिक मोहोत्सव प्रभू श्रीरामाच्या लंका विजयी आगमनाचे प्रतीक म्हणून आपण दिवाळी साजरी करीत असतो.

लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजला मोकळया जागेत, सुरक्षित अंतर ठेवत मास्क लावत फटाके फोडता येतील, लहान मुलांच्या सुरक्षेकरिता घरातील मोठ्यांनी सोबत असावे. सुरक्षित आणि आनंदमय दिवाळी साजरी करण्याचे सरकारचे आदेश आहेत ते नागरिकांना कडकपणे पाळावे लागतील असे मुंबई महानगर पालिकेच्या बी आणि सी वार्डचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी म्हटले आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai BMC bans sale loud and smoky firecrackers due corona infection

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.