लसीकरणासाठी मुंबई पालिकेने मागवल्या होत्या जागतिक निविदा (Global Tender)
मुंबई: कोविड प्रतिबंधक लस खरेदीसाठी (Corona Vaccination) महानगर पालिकेने (Mumbai BMC) मागवलेल्या जागतिक स्वारस्याच्या अभिरूचीत (Global Tenders) नऊ पैकी एकही पुरवठादार पात्र ठरला नाही. या पुरवठदारांनी उत्पादक कंपनीसोबत केलेल्या कराराचे पत्र सादर न केल्याने महानगर पालिकेने हा निर्णय घेतला असल्याचे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. (Mumbai BMC disqualifies all companies bid for global tender for COVID19 vaccine procurement)
महानगर पालिकेने लस खरेदीसाठी जागतिक पातळीवर स्वारस्याची अभिरुची मागवली होती. त्यात नऊ पुरवठादारांनी अर्ज केला होता.1 कोटी डोससाठी हे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. पालिकेकडे अर्ज केलेेले सर्व पुरवठादार होते. यात, उत्पादन करणारी कंपनी सहभागी नव्हती. त्यामुळे पालिकेने संबंधित पुरवठादारांकडून उत्पादक कंपनीशी झालेल्या कराराची प्रत मागितली होती. मात्र, यासह काही आवश्यक कागदपत्र हे पुरवठादार सादर करु शकले नाही. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
आता मुदत संपल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. तसेच, केंद्र सरकारच्या स्तरावर काही लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता तात्काळ निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्रांकडून होणाऱ्या निर्णयावर लक्ष देण्यात येणार आहे. आठवडाभर याकडे लक्ष ठेवण्यात येणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले. महानगर पालिकेने पहिली मुदत 25 मे पर्यंत दिली होती. त्यानंतर 1 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, त्यानंतरही हे पुरवठादार आवश्यक कागदपत्र सादर करु शकले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.