मुंबई : लहान घरांना मालमत्ता करमाफी (property tax free), वादळ-पावसाची नुकसानभरपाई, पिण्याचे पाणी (drinking Water), खड्डेमुक्त रस्ते (No potholes on road) आदी मुंबईकरांच्या मागण्यासाठी (Mumbaikar demands) शहर भाजपतर्फे (bjp) आज मुंबईतील 24 प्रभाग कार्यालयांवर (Mumbai ward office) लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी मोर्चे (strike) काढण्यात आले.
या मोर्चांद्वारे शहर भाजपने पाच-सहा महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. मुंबई भाजपचे शहर प्रभारी कांदिवलीचे (पू) आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून व नियोजनातून हे मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अमित साटम, आशीष शेलार, मनीषा चौधरी आदी आमदार तसेच स्थानिक नगरसेवक सहभागी झाले होते.
विश्वासघात मोर्चा
भातखळकर यांच्यातर्फे आर (दक्षिण) प्रभाग कार्यालयावर विश्वासघात मोर्चा काढण्यात आला. बारमालकांना करसवलत देणाऱ्या सरकारने वादळे-अतिवृष्टी यांचा फटका बसलेल्या मुंबईकरांना कोणतीही मदत केली नाही, शिवसेनेने निवडणुक प्रचारात आश्वासन देऊनही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केला नाही, हजारो कोटी रुपये खर्चूनही स्वच्छ पाणी आणि खड्डेमुक्त मुंबई दिली नाही, यासंदर्भात पालकमंत्र्यांनी भाजप आमदारांना भेटही दिली नाही, यांच्या निषेधार्थ हा मोर्चा होता. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आणखीन मोठे आंदोलन केले जाईल, असा इशाराही भातखळकर यांनी यावेळी दिला.
कलानगर, वरळी हे भागच मुंबईत आहेत का - शेलार
महापालिका कारभाऱ्यांच्या दृष्टीने मुंबईत फक्त कलानगर आणि वरळी हे दोनच भाग असून सर्व प्रकल्प याच दोन भागात जातात. मग बाकीचे मुंबईकर काय सवतीचे आहेत का ? असा सवाल भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी एम (पश्चिम) प्रभाग कार्यालयावरील मोर्चादरम्यान केला. आम्ही मुंबईकरांचे प्रश्न मांडणार, कामांचा हिशेब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागणारत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पालिकेचा दरवर्षीचा तीस हजार कोटी रुपयांचा खर्च जमेस धरता पाच वर्षांत दीड लाखकोटी रुपये खर्च केले. मात्र याबदल्यात मुंबईकरांना काहीच सोयी मिळाल्या नसल्याने हे पैसे गेले कोठे, असा प्रश्नही शेलार यांनी केला.
कार्यालयास कुलूप ठोकले
अंधेरीचे (प) आमदार अमित साटम यांनी के (पश्चिम) प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून तेथील प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. महापालिकेतील 25 वर्षांच्या शिवसेनेच्या राजवटीतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ही कृती केल्याचे ते म्हणाले. या प्रभागातील बिल्डिंग आणि फॅक्ट्री खात्यात मोठा भ्रष्टाचार असून प्रभाग अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही साटम यांनी केला. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी साटम यांच्यासह काही कार्यकर्त्यांना काहीकाळ स्थानबद्ध केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.