मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर ठाम

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर ठाम
Updated on

मुंबई: महाविकास आघाडीत मुंबई महानगर पालिका निवडणुका लढण्यावर आता पासूनच मत मतांतरे सुरु झाले आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी पालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतून महायुतीत निवडणूक लढण्याची भूमिका मांडली जात आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढावी अशी मुंबईतील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. ही भूमिका त्यांनी दिल्लीतील नेत्यांपुढेही मांडली आहे. मुंबई कॉंग्रेसचे नव निवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनाही रविवारी ही भूमिका मांडली. यापूर्वी कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष तसेच आरपीआयच्या काही गटांची आघाडी होती. पण, महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वतंत्र लढत होती. त्याचा आघाडीवर कोणताही परिणाम होत नव्हता. कॉंग्रेसने 227 जागा लढवल्या आहेत. त्या आताही लढवेल. त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कॉंग्रेसने पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार सुरु केलेला असताना शिवसेना, राष्ट्रवादी कडून महायुतीचा सुर आवळला जात आहे.‘महायुतीचे वरिष्ठ नेते मॅच्यूअर आहेत. त्यांना विरोधकांचा अंदाज असल्याने ते योग्य निर्णय घेतील. पण मला आजही खात्री वाटते ही निवडणूक महाआघाडी सर्व पक्ष सोबत लढतील, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.

तर,आमची भूमिका सोबत लढण्याची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसेच सांगितले आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. काही नेते स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडत आहे. पण कॉंग्रेसने अद्याप अधिकृत भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे हे काही नेत्याचे वैयक्तिक मत असू शकेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते,अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai bmc elections mla bhai jagtap said congress on its own

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.