मुंबई महापालिकेची नवी नियमावली जाहीर; वाचा काय आहेत बदल

छोट्या-मोठ्या दुकानदारांना काहीसा दिलासा; पाहा नवे नियम
mumbai
mumbaisakal
Updated on
Summary

छोट्या-मोठ्या दुकानदारांना काहीसा दिलासा; पाहा नवे नियम

मुंबई: राज्यातील (Maharashtra Lockdown) कोरोना परिस्थिती सुधारताना दिसत असली तरीही राज्यातील काही जिल्ह्यात अद्याप रूग्णसंख्या (Coronavirus) वाढ मोठ्या प्रमाणावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी रात्री जनतेशी संवाद साधला आणि राज्यातील काही भागांतील निर्बंध शिथिल करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, मुंबई महापालिका (Mumbai BMC) प्रशासनाने 'ब्रेक द चेन' (Break the Chain) अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली. (Mumbai BMC Issues new rules guidelines as per break the chain Maharashtra Lockdown)

mumbai
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'चा विसर?

नव्या नियमावलीतील ठळक मुद्दे-

  • अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सर्व दिवस उघडण्यास परवानगी

  • आवश्यकतेनुसार, दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 उघडी राहतील

  • पहिल्या आठवड्यात उजव्या बाजुची दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि समोरच्या डाव्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवारी उघडी राहतील

  • दुसऱ्या आठवड्यात डाव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि उजव्या बाजूची दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील

mumbai
मज्जा वाटते म्हणून निर्बंध वाढवत नाहीय - आदित्य ठाकरे
  • शनिवार, रविवार सर्व दुकाने पूर्णपणे बंदच राहतील

  • ई-कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तुंबरोबर आवश्यक नसणाऱ्या काही वस्तुंचे वितरण करण्यास परवानगी असेल.

  • शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.