मुंबईत गर्भवती महिलांचे लसीकरण 'या' दिवसापासून होणार सुरू

मुंबईत गर्भवती महिलांचे लसीकरण 'या' दिवसापासून होणार सुरू सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून होणार सुरूवात Mumbai BMC to vaccinate pregnant women from Thursday
Vaccination-Pregnant
Vaccination-Pregnant
Updated on

सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून होणार सुरूवात

मुंबई: लसीअभावी गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेल्या लसीकरणाची मोहिम (Vaccination Drive) सोमवारपासून (Monday) पुन्हा सुरू होणार आहे. राज्य सरकारकडून मुंबई पालिकेला 85 हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यासोबत, आता गर्भवती महिलांचेही (Pregnant) लसीकरण मुंबईत केले जाणार आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) गुरुवारपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला प्रारंभ करणार आहे. (Mumbai BMC to vaccinate pregnant women from Thursday)

Vaccination-Pregnant
"सत्ता टिकवण्यासाठी हिंदुत्व तर सोडलंच आहे, पण किमान..."

महानगरपालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, गर्भवती महिलांना लस देताना कर्मचार्‍यांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. गुरुवारपासून गर्भवती महिलांचे लसीकरण होईल आणि सोमवारपासून मुंबईतील महापालिका केंद्रांवरही लसीकरणाचे काम सुरू होईल. शनिवारी केवळ खासगी केंद्रांवर लसीकरणाचे काम सुरू राहिले. शनिवारी खासगी केंद्रांवर 48,393 लोकांना लस देण्यात आली असून, यासह शहरातील एकूण लसीकरणाची संख्या 60 लाख 9 हजार 25 वर पोहोचली आहे.

Vaccination-Pregnant
"आम्ही भाजप नेत्यांना 'चंपा' किंवा 'टरबुज्या' म्हणणार नाही"
Corona Vaccination
Corona Vaccinationesakal

मॅटर्निटी होममध्ये दिली जाणार लस-

मुंबईतील गर्भवती महिलांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी पालिकेने त्यांच्या लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. या गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी पालिकेने काही केंद्रांची निवड केली असून यामध्ये पालिकेच्या मॅटर्निटी होमचा समावेश आहे. जवळपास 25 ते 30 केंद्रांमध्ये हे लसीकरण होईल. डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी महापालिकेने प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये तसेच, मॅटर्निटी होमसह शिवाय, ज्या रुग्णालयांमध्ये महिलांची प्रसुती होते अशा उपनगरीय रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय केली गेली आहे.

Vaccination-Pregnant
१०० कोटी खंडणी वसुली: सचिन वाझेचा 'ईडी'ने जबाब नोंदवला

गर्भवतींसाठी वेगळी सोय-

या केंद्रांवर गर्भवती महिलांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांग आणि बसण्याची व्यवस्था असेल. शिवाय, केंद्रावर लसीचे फायदे आणि त्याचा प्रभाव नमूद करणारे लसपत्रिका उपलब्ध असतील. मुंबईत दीड लाखांहून अधिक गर्भवती महिला आहेत. गर्भवतींचा लसीकरणासाठी वाढलेल्या प्रतिसादानुसार केंद्रांमध्ये वाढ केली जाईल, असेही डॉ. गोमारे यांनी सांगितले आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.