BMC : कोविड खर्चाची कुंडली तयार होणार; स्थायी समितीचे निर्देश

BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : कोविड काळात (corona pandemic) महानगर पालिकेने खर्चाचा (BMC Expenses) सविस्तर अहवाल (detail report) सादर करण्याचे निर्देश आज स्थायी समितीने (sthayi samiti) प्रशासनाला दिले आहेत. कोविड काळात प्रतिबंधसाह उपाय योजनांसाठी महानगर पालिकेने (bmc) 4 हजार 500 कोटी हून अधिक खर्च केला आहे. त्याची सविस्तर माहिती प्रशासनाला सादर केली जाणार आहे.

BMC
गणेश नाईक यांच्या मागणीला सिडकोकडून सकारात्मक प्रतिसाद

कोविड काळात लॉकडाऊनमुळे प्रशासनाला विशेष अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार तातडीच्या कामांसाठी स्थायी समिती आणि महासभेची परवानगी न घेता प्रशासनाला आवश्‍यक खरेदी,कंत्राट देत होते. याबाबतची माहिती प्रशासन आता स्थायी समितीच्या पटलावर मांडत आहे.त्यावर भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी आक्षेप घेत या खर्चाच संपूर्ण लेखाजोखा स्थायी समितीला सादर होणे गरजेचे आहे.त्यासाठी श्‍वेत पत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही या माहितीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी केली. कोविड काळात चांगले काम झाले आहे. मात्र,10 रुपयांची वस्तू 100 रुपयांना खरेदी केल्याची शक्यता आहे.असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.या खर्चाचे लेखापरीक्षण होण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमुद केले.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही प्रशासनाकडून सादर झालेल्या माहितीवर अाक्षेप घेतला. यापुर्वीही अध्यक्ष यशवंत जाधव याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जात आहे.पण,प्रशासनाकडून ठोस माहिती दिली जात नाही.त्यामुळे प्रशासना बरोबरच स्थायी समितीही संशयाच्या भोवऱ्यात सापडते. हा तपशीलवर खर्च सादर होणे गरजेचे आहे.असेही त्यांनी नमुद केले. यावर कोविड काळात झालेल्या खर्चाचा तपशीलावर अहवाला स्थायी समितीला सादर करावे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. सदस्यांकडून वेळोवेळी मागणी झाली आहे. ती आता तपशीलवार माहिती दिली जावी असे जाधव यांनी नमुद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.