Mumbai : गिधाडांचे संवर्धन भारतातील गिधाडांची संख्या वाढावी यासाठीच !

बीएनएचएसच्या संवर्धन प्रजनन केंद्रामुळे गिधाडांच्या संख्येत लक्षणीय वाढ
गिधाड संवर्धनाचा जागर
गिधाड संवर्धनाचा जागरsakal
Updated on

मुंबई : बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)मधील ७५० गिधाडं ही निसर्गमुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हे पक्षी सोडण्यात येऊ नये बीएनएचएसमध्ये अंतर्गत धुसपूसही सुरु आहे. मात्र संवर्धनातील निसर्गमुक्त होण्यासाठी तयार असणाऱ्या पक्ष्यांना सोडण्यात यावे अशीच भूमिका, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार तसेच बीएनएचएसची आहे.

बीएनएचएसच्या भारतातील हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आणि आसाम या चार राज्यातील प्रजनन केंद्रांमध्ये ७५० पक्षी निसर्गमुक्त होण्यासाठी तयार आहेत. २००४ पासून बीएचएनएसने गिधांडांच्या 'बंदिस्त प्रजननाचे' काम सुरु केले. तेव्हापासून आजपर्यंत या 'संवर्धन प्रजनन केंद्रा'त असणाऱ्या

एकूण पक्ष्यांपैकी ८० टक्के मोठे पक्षी, २० टक्के पिलं आणि काही प्रजननक्षम पक्षी आहेत. जेव्हा प्रकल्प सुरु झाला तेव्हाच या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट हे भारतात या पक्ष्यांना पुनर्स्थापित करणे हे होते. टप्पाटप्याने या पक्ष्यांना निसर्गमुक्त करायचेच होते. एकीकडे प्रजननही होत राहणार तर दुसरीकडे पक्षी निसर्गमुक्त होत राहणार, असा कार्यक्रम सातत्याने सुरु राहणार, असे बीएचएनएसने सांगितले.

गिधाडं निसर्गमुक्त होतात कशी?

या पक्ष्यांना निसर्गमुक्त करताना हे यशस्वी होतंय की अपयशी ठरतंय यासाठी मॉनिटरिंग केले जाते. पक्षांना संवर्धन केंद्रात दिलेलं खाद्य खाण्याची सवय लागेल असते. त्यामुळे सुरुवातीला पक्षी उडून जातंच नाही. त्यासाठी शास्त्रज्ञांना जंगली गिधाडं खाद्य देऊन बोलवावे लागतात.

ही गिधाडं येण्यास सुरुवात झाली की मग संवर्धन केलेल्या पक्ष्यांना बाहेर काढलं जाते. सुरुवातीला केंद्रातील पक्षी जंगली पक्ष्यांसोबत खाद्य खातात. कधीकधी इतर झाडांवर बसलेली जंगली गिधाडं बघून केंद्रातील पक्षी केंद्राकडे परततात. अशा पक्षांना पुन्हा बाहेर सोडले जाते. ही प्रक्रिया साधारण महिनाभर चालते.

महिनाभरानंतर आमचे पक्षी या जंगली गिधाडांसोबत निसर्गमुक्त होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला ते इथेच जवळपासच्या झाडांवर झोपतात. बरेच पक्षी हे इतर देशांमध्येही निघून जातात. त्यामुळे सोडण्यात येणाऱ्या पक्ष्यांना चिप लावून सोडावे लागते. रात्रंदिवस त्यांचे मॉनिटरिंग करावे लागते. हे पक्षी निसर्गमुक्त करण्यासाठी असणारी प्रक्रिया खर्चिक आणि अधिक वेळ घेणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.