Mumbai Bridge : गोखले ब्रिजच्या उभारणीत अडथळ्यांची शर्यत

गोखले पुलासाठी मार्गात ही 13 बांधकामे अडसर ठरल आहेत.
Gokhale Bridge Mumbai
Gokhale Bridge MumbaiSakal
Updated on

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाच्या दोन मार्गीका ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येतील आणि संपूर्ण पूल डिसेंबर अखेरपर्यंत खुला होईल, असा दावा पालिका प्रशानाने केला होता. मात्र या पूलाची अडथळ्यांची शर्यत सुरू आहे.

गोखले पूलाला अडथळा ठरणारी 13 बांधकामे हटवावी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागाने दिली आहे.

गोखले पुलासाठी मार्गात ही 13 बांधकामे अडसर ठरल आहेत. या बांधकामांवर पावसाळ्यात कारवाई करणे शक्य नसल्याचे पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.

न्यायालयाचा तसा आदेश असल्याचे ते म्हणाले. पूल विभागाच्या अधिका-यांने सांगितले की, पूल विभागाने सुरुवातीला पूर्ण झालेल्या भागातून 10 मीटरच्या मंजुरीची विनंती केली होती. मात्र, कंत्राटदाराला आता क्रेनचा वापर करण्यासाठी आणखी जागा हवी आहे. त्यामुळे ही बांधकामे हटवावी लागणार असल्याचे पूल विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल नोव्हेंबर 2022 पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जून महिन्याच्या अखेरीस गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका प्रयत्नशील होती.

पुलाच्या बांधकामासाठी विशेष करून स्टील गर्डरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्याने कामात विलंब झाला असल्याचा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Gokhale Bridge Mumbai
SAKAL Exclusive: : F & O ट्रेडिंग शिकवणीतून विजय ठाकरेंचे तरुणाईला मार्गदर्शन

कामात अडथळे

जून अखेरीस पावसाळच्या आधी हे काम पूर्ण करून गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्यात येणार होत्या. तर संपूर्णपणे गोखले पूल हा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न होता. 7 नोव्हेंबर 2022 पासून गोखले पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. मात्र आता 13 बांधकामे कामात अडथळा ठरत असल्याची पालिकेच्या पूल विभागाने सांगितले.

Gokhale Bridge Mumbai
D-Gang : ‘डी-गॅंग’शी अनंत जैनचा संबंध?

नोव्हेबर उजाडणार

परराज्यातून होणारा स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्याने या कामाला विलंब लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गोखले पूल पुन्हा सुरू होण्यास नोव्हेंबरची वाट पहावी लागणार आहे.

Gokhale Bridge Mumbai
Vitamin H च्या कमतरतेमुळे शरीरात उरणार नाही एनर्जी, ही लक्षण दिसताच घ्या योग्य आहार

वाहतूक कोडींचा त्रास

पुलाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाळ्यातही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पश्चिम उपनगरात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.