Mumbai News : नामांकित महाविद्यालयात 'बुरखा' बंदी; चेंबूर भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Mumbai Burkha Ban: मुंबईतील चेंबूर परिसरातील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थिंनींच्या बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
women burkha
women burkhaEsakal
Updated on

Burkha Ban in Mumbai:काही वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये शाळेत मुलींच्या हिजाब घालण्यावरुन पूर्ण देशात अशांतता पसरली होती. या हिजाब प्रकरणामुळे देशभरात धार्मिक तेढ निर्माण झाली होती. त्यानंतर आता अशीचं काहीशी घटना महाराष्ट्रातही घडली आहे.

मुंबईतील चेंबूरमध्ये एक घटना समोर आली आहे. चेंबूरमधील आचार्य आणि डी.के मराठे कॉलेजमध्ये बुरख्या घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर महाविद्यालयाच्या या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम विद्यार्थींनींनी आंदोलन केलंय.

समाज माध्यमांवर एक व्हिडीयो व्हायरल झाला होता, ज्यात बुरखा घातलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाच्या गेटमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. महाविद्यालयाला गणवेश बंधनकारक आहे.

विद्यार्थिंनींनी भूमिका मांडलीये की महाविद्यालयाने आम्हाला गणवेश घालण्यासाठी एक जागा निश्चित करुन द्यावी आणि महाविद्यालयाच्या प्रशासनाचं सांगण आहे की, विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या बाहेरुनचं गणवेश घालून यावा. (Latest Marathi news)

विद्यार्थी संघटनांनी यावर आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेर पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

women burkha
Marathi News Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींची माहिती, जाणून घ्या एका क्लिकवर...

काही वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणाने संपूर्ण देशात हिंदू-मुस्लिम संघर्ष निर्माण झाला होता. ज्याने देशात तणाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. हा वाद उच्च न्यायालयातही गेला होता. कर्नाटकातील एका शाळेत मुलींच्या हिजाब घालून शाळेत येण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी भगवा गमछाही घातला होता.

(Latest Marathi news)

women burkha
मुद्द्याचं बोला! कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक, अनोखं जॅकेट घालून वेधलं सगळ्यांचं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()