Mumbai: बेकायदा पोस्टर्स, बॅनरबाजी लावणा-या ४१० जणांविरोधात गुन्हे दाखल

BMC
BMC
Updated on

पालिकेने वर्षभरात २० हजार बेकायदा राजकीय पोस्टर्स हटविले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली छबी लोकांपर्यंत पोचविण्यासाठी बेकायदेशी पोस्टर आणि बॅनर्स लावणा-यांविरूध्द पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

BMC
Mumbai News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे बौद्ध‍िक संपदेचे कार्यक्षेत्र अमर्याद असेल

मुंबईत बेकायदेशीर पोस्टर आणि बॅनर्स लावणा-याविरूध्द धडक कारवाई पालिकेने सुरू केली आहे. आतापर्यंत ४१० जणांविरूध्द या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर गेल्या वर्षभरात २० हजार बेकायदेशीर राजकीय पोस्टर आणि बॅनर्सवर कारवाई करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या बॅनरबाजीवर नाराजी व्यक्त करत राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले.

BMC
Mumbai News: अटल सेतू नंतर आता होणार या सागरी सेतूचं लवकरच होणार उद्घाटन; पायलिंगचे काम झाले सुरू

मुंबईत मिळेल त्या जागेवर बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होडिॅग विद्रुपीकरण होत आहे. जानेवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९ हजार ८८५ राजकीय पक्षांचे बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होडिॅग हटवण्यात आले. तर राजकीय पक्ष व व्यवसायिक पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्या ४१० जणांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स झळकवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने याआधीही मुंबई महापालिकेला दिले आहेत.

BMC
Mumbai News: डेंग्‍यूचा डास आढळल्‍यास मनपा करणार कडक कारवाई!

तरीही राजकीय पक्षांचे बॅनर्स पोस्टर्स व होर्डिंग्ज ठिकाणी ठिकाणी झळकतात. तसेच व्यवसायिक पोस्टर्स बॅनर्स अनधिकृतपणे लावले जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

१ जानेवारी २०२३ २० फेब्रुवारी २०२४ या १४ महिन्याच्या कालावधीत पालिकेने धडक मोहिमेत तब्बल ५३ हजार ५७० होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई केली. यामध्ये व्यावसायिक ४,९३० धार्मिक ३७,८२२ व राजकीय १९ हजार ८८५ अशी एकूण ६२,६३७ होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स हटवण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

BMC
Mumbai News: डेंग्‍यूचा डास आढळल्‍यास मनपा करणार कडक कारवाई!

चौदा महिन्यात झालेली कारवाई

राजकीय - १९,८८५

व्यावसायिक - ४,९३०

धार्मिक - ३७,८२२

एकूण - ६२,६३७

BMC
Mumbai Crime News: मालकाच्या जेवणात विष मिसळून नोकराने पळवला 2.50 कोटींचा हिरा अन् दागिने...पण आधार नंबरमुळे झाली फजिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.