मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वेच्या समन्वयाने ऑपरेशन नन्हें फरिश्ते अंतर्गत एका महिन्यात १९४ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये १४४ मुले आणि ५० मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी आरपीएफला चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदत झाली आहे.
'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत हरवलेल्या / घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे. देशभरातील अनेक मुले मुंबईचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात.
मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत आरपीएफ पोलिसांनी मार्च ते एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांवर, प्लॅटफॉर्मवरील १९४ मुलांची सुटका केली आहे.यामध्ये १४४ मुले आणि ५० मुलींचा समावेश आहे.
काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांकडून आढळतात. हे प्रशिक्षित RPF कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.