Mumbai Latest News: भरधाव वेगात असलेल्या प्रगती एक्सप्रेससमोर उडी घेवून मध्य रेल्वेचा एका मोटरमॅनने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली आहे. मुरलीधर शर्मा (५६) असे आत्महत्या करणाऱ्या मोटरमॅनचे नाव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास मोटरमॅन प्रगती एक्सप्रेस यांनी सँडहर्स्ट रोड ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान सीएसएमटी जाणाऱ्या प्रगती एक्सप्रेस समोर ट्रेनसमोर उडी घेवून आत्महत्या केली.
या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या काहीकाळा लोकल ट्रेन थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काही मोटमॅन सकाळशी खासगीत बोलताना सांगितले कि, शुक्रवारी सकाळी मुरलीधर शर्मा पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये कर्त्यव्यावर होते. यादरम्यान सीएसएमटीकडे लोकल घेऊन जात असताना त्याच्याकडून कुर्ला स्थानकात सिग्नल पासिंगची घटना घडली.
घटना घडल्यानंतर अवघ्या काही वेळातच मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी भायखळा स्थानक नजीक वेगाने येणाऱ्या प्रगती एक्सप्रेस समोर येत आत्महत्या केली आहे. मात्र, यासंदर्भात मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांना विचारले असता त्यांनी संगीतले की,यासंदर्भात चौकशी सुरु आहे. आत्महत्या आहे की ट्रेस पासिंगची घटना आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.