मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव 'नाना शंकर शेट' सेंट्रल टर्मिनस होणार

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव 'नाना शंकर शेट' सेंट्रल टर्मिनस होणार
Updated on

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल टर्मिनसचे लवकरच 'नाना शंकर शेट सेंट्रल टर्मिनस' नामकरण होणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आहे. केंद्र सरकारकडून नामकरणाची प्रक्रिया सुरु आहे, अशी खासदार अरविंद सावंत यांनी दिली. त्यामुळे लवकरच पुढील स्थानक 'नाना शंकर शेट सेंट्रल' अशी उद्घोषणा प्रवाशांना ऐकू  येणार आहे. 

अरविंद सावंत यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे  नामकरण ‘नाना शंकर शेट’टर्मिनस करण्याच्या विनंती संदर्भात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिले होते. या पत्रातून राय यांनी सकारात्मक उत्तर दिले. स्थानकाच्या नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती राय यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकारची परवानगी मिळाली असून केंद्राकडून देखील परवानगी मिळाल्याने स्थानकाचे नामकरण करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

भारतीय रेल्वेचे जनक मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकर शेट नाव देण्याची अनेक वर्षांपूर्वी पासूनची मागणी आहे. नामदार जगन्नथ उर्फ नाना शंकर शेट प्रतिष्ठान यांच्यावतीने   तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारने विधिमंडळात प्रस्ताव मंजूर झाला. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता.

दरम्यान, नामकरण करण्याविषयी केंद्र सरकारकडून विलंब होण्याचे कोणतेही कारण नाही. यासंदर्भात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिले. यावर राय यांनी माहिती दिली की, नामांतराला केंद्र सरकार सकारात्मक भूमिका आहे. केंद्र सरकारकडून याबाबत प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि नाना शंकर शेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळेल, असे अरविंद सावंत यांनी माहिती दिली. 

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Central Terminus will be named Nana Shankar Shet Central Terminus

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.