...नाहीतर मुंबई पेटायला वेळ नाही लागणार!

...नाहीतर मुंबई पेटायला वेळ नाही लागणार!
Updated on

मुंबई : दिल्लीतील भीषण आगीच्या घटनेनंतर मुंबईत ही तश्‍या प्रकारची दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यातच शहरातील बहुतांश 'वॉटर हायड्रंट' बंद अवस्थेत असल्याने हा धोका अधिक वाढला आहे. अस असलं तरी मुंबई अग्निशमन दल आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने अश्‍या दुर्घटनांचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

आग विझवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वॉटर हायड्रंटची व्यवस्था इंग्रज सरकारच्या काळापासून करण्यात आली होती. आज या व्यवस्थेची दुरावस्था झाली असून अनेक वॉटर हायड्रंट अडगळीत गेले आहेत. अग्निशमन दलाच्या आकडेवारीनुसार मुंबईत 10 हजार 843 वॉटर हायड्रंट अस्तित्वात आहेत. मात्र यातील केवळ 1 हजार 353 हायड्रंट सुस्थितीत सुरू असून तब्बल 9 हजार 290 वॉटर हायड्रंट बंद असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

दिल्लीतील झांसी मार्गावर लागलेल्या अग्निकांडात 43 जणांचा बळी गेल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली. या घटनेनंतर पुन्हा एकदा आग सुरक्षेवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र मुंबईत असे अनेक दाटीवाटीचे जुने व्यावसायिक परिसर असल्याने अश्‍या परिसरात आगी लागण्यासारख्या दुर्घटनेचा धोका अधिक आहे.

अशा प्ररीसरात नेहमीच लोकांची प्रचंड गर्दी असते. अधिक नफा कमावण्याच्या उद्देश्‍याने छोट्या छोट्या बाजारात आणि दुकानांमध्ये अनेक लोक काम करतात.मात्र अश्‍या परिसरात आग लागली तर मोठी दुर्घटना होऊ शकते.अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील दुर्घटना अतिशय दुर्दैवी होती. मात्र आपण यातून बरंच काही शिकण्याची गरज आहे.मुंबईतील परिस्थिती पाहता अशी दुर्घटना इथे देखील घडू शकते. मुंबईत असे कित्येक परिसर आहेत जिथे अग्निशमन दलाचे बंब जाऊ शकत नाहीत.बंब जाण्यासाठी कमीतकमी 6 मीटरचा रस्ता असणे आवश्‍यक आहे.मात्र मुंबईतील अनेक रस्ते अवैध फेरीवाले आणि पार्किंग ने व्यापले आहेत. 

साधारण तीन वर्षांपूर्वी सीएसएमटी जवळील मनीष मार्केटमध्ये देखील अशीच आग लागली होती. छोटा रस्ता आणि ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं होतं..याठिकाणी कामगार,व्यापारी यांच्यासह ग्राहकांची गर्दी बघायला मिळते. मायर इथल्या गल्ल्या किंवा रस्ते निमुळते आहेत. यामुळे इथे आग लागल्यास मोठ्या प्रमाणात जीवित हानीची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मी स्वता याबाबत अनेकदा आवाज उचलला आहे.मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने वॉटर हायड्रंट उपयुक्त असून त्यांना पुनर्जीवित करणं आवश्‍यक आहे.अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने त्याच महत्व मात्र मुंबईचा जुना ठेवा देखील आहे.शहरातील वॉटर हायड्रंट आढावा घेण्याच्या सूचना मी प्रशासनाला पुन्हा एकदा देणार आहे. 

किशोरी पेडणेकर , महापौर 


अग्निशमन दलाकडे आधुनिक तंत्रज्ञान 

मुंबई अग्निशमन दलाकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे.अग्निशमन दलातील कर्मचारी आणि अधिकारी हे प्रशिक्षित आहेत.यामुळे मुंबईत अग्निशमन दल कोणत्याही दुर्घटनेचा सामना करण्यास नेहमीच तयार असते.आगीचा शास्त्रोक्त पद्धतीने अंदाज घेण्याची यंत्रणा तयार आहे.अग्निशमन विभागात जम्पिंग मशीन असून आपत्कालीन परिस्थितीत ती केवळ 30 सेकंदामध्ये कार्यरत होऊ शकते.याशिवाय अग्निशमन दलाकडे 6 लाख लिटर क्षमतेचे 32 पाण्याचे टॅंकर्स आहेत. 

आगीचा धोका असणारे परिसर 

मुंबईत अनेक जुने बाजार आणि व्यावसायिक इमारती असून याठिकाणी दाटीवाटीने दुकानं आणि कार्यालये थाटण्यात आली आहेत.भुलेश्वर,भेंडी बाजार,वाळकेश्वर, शास्त्रीनगर, बेहराम पाडा,धारावी परिसरात अनेक जुन्या व्यापारी पेठा असून अग्निसुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर संवेदनशील आहेत. 

वर्षभरात 1 हजाराहून अधिक आगीच्या दुर्घटना 

मुंबईत गेल्या वर्षभरात आगीच्या 1 हजार 402 घटना झाल्या आहेत.यात 91 लोकं जखमी तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 


महत्त्वाची बातमी : जेवणात मटणाचे तुकडे कमी दिले म्हणून तिला जीवंत जाळलं, पुढे... 

मुंबईतील भीषण अग्निकांड 

  • कुर्ला पश्‍चिम येथील सीएसएमटी रस्त्यावरील कपाडीया नगरच्या रद्दी सामानाला आग, 25 गोदामाना जळून खाक गॅस 
  • सीएसएमटी - मशिद स्थानकाजवळील झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीमुळे काही वेळ रेल्वे गाड्याही थांबवण्यात आल्या. या आगीत सहा ते सात मुले जखमी झाली. 
  • गिरगावातल्या काकडवाडीत आग लागली. येथे तळमजल्यातील लॉंड्रीतल्या कपड्यांनी पेट घेतला (सकाळी) ही आग पहिल्या मजल्यापर्यंत गेली व त्यात एका कुटुंबातील दोघं जखमी झाली तर एकाचा मृत्यू झाला. 
  • नायर रुग्णालयातील ईएनटी विभागाच्या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे भर दुपारी मोठी आग लागली. ती विझवायला तीन तासाहून अधिक वेळ लागला. या आगीत विद्युत यंत्रणांचे नुकसान झाले. 
  • चेंबुरच्या आर के स्टुडीओत दोन सेट जळून खाक झाले. येथे आग विझवणारी अग्निशमन यंत्रणा काम करीत नव्हती. यावेळी चित्रीकरण नसल्याने मोठी दुर्घटनाटऴली. 
  • विलेपार्ले येथील सागर ज्योती इमारतीत आग लागली. या आगीत काहीजण जखमी झाले. 
  • जवाहरव्दीप व बुचर बेटावरच्या बीपीसीएल टाकीवर वीज पडून मोठी आग लागली. 30 हजार मेट्रिक टनाच्या टाकीत हायस्पीड डिझेल ठेवलेले होत, ते जळालं. 
  • वांद्रे पूर्व येथील गरीब नगर- बेहराम पाडा झोपडपट्टीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. यांत तीघे जखमी झाले आहेत. 
  • दोन महिन्यांपूर्वी विलेपार्ले येथील सागर ज्योती या इमारतीत भीषण आग लागली. ही आग विझवताना एक जवान जखमी झाला. 
  • वर्ष संपता संपता साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत आज 12 कामगार होरपळून ठार झाले. 
  • कमला मिल दुर्घटना 14 जणांचा मृत्यू 
  • अंधेरी कामगार रुग्णालयात लागलेली आग,यात सहा ज्यांचा मृत्यू झाला होता 
  • एमटीएन मधील भीषण आग, यात 84 जणांना सुखरूप वाचवण्यात यश. 

mumbai city has sophisticated fire fighting system but its most of the water hydrants are not working 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()