मुंबई : सोमवारपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र दुसरीकडे आंदोलन, निदर्शनांचे ठिकाण असलेले आझाद मैदान मात्र यावेळी सुने सुने आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात ऐरवी मैदान मोर्चेकर्यांनी भरून असते. मात्र यावेळी कोरोना रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मैदानाचे दरवाजे आंदोलकांसाठी बंद केले आहे.
आपल्या न्याय हक्कासाठी दाद मागण्यासाठी आझाद मैदानावर हजारो आंदोलक जमतात. मात्र यावेळी 10 दिवसाचे अधिवेशन असतांना, आझाद मैदान शांत झाले आहे. मैदानात केवळ संगणक परिचालक संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत.पोलिसांनी नोटीस दिल्यावरही या कार्यकर्त्यांनी मैदान सोडले नाही. पोलिसांनी या या आदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे.उर्वरित मैदानावर नजर टाकल्यास सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. या मैदानात केवळ पोलिसांचा बंदोबस्त दिसतो. आंदोलकांची उपस्थिती नसल्याचा परिणाम येथील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स,चहाच्या टपऱ्याना बसलाय. गेल्या दोन दिवसाच्या उत्पन्नाला चांगलाच फटका पडल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र टी कोल्ड्रिंकचे जे.के.विरानी सांगतात की,''कोविड मुळे आधीच मंदी असलेला व्यवसाय थोड़ा सुरु झालेला होता आता परत कोरोनामुळे आझाद मैदानात आंदोलन होणार नसल्याने यावेळी 15 हजारांचे उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे'.
येथील मनोहर पालये सांगतात की,'आझाद मैदानात येणारे आदोलक आमच्या येथे चहा नाष्टा घेतात. मात्र यावेळी आंदोलनाला बंदी घातल्यामुळे आमच्या कमाईला फटका बसला आहे. '
'शासन जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य करीत नाहीत तो पर्यंत आम्ही घरी जाणार नाही.आम्ही सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत मास्क लावून आंदोलन करत आहोत, आम्हाला दिवसा पिण्यासाठी पाण्याचा येणारा टैंकर येत नाही तसेच रात्री वीज पुरवठा,तसेच ध्वनीक्षेपक वापरण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे'. असे आंदोलक सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
----------------------------------------
( Edited by Tushar Sonawane )
mumbai city marathi Azad Maidan was quiet at the beginning of the convention live latest updates
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.