Mumbai Costal Rode: वरळी ते मरीन ड्राइव्ह एक लेन वाहतुकीसाठी सज्ज!

लोकार्पण सोहळा पुढे ढकलला ; प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे पालिकेने सांगितले.
Mumbai Costal Rode: वरळी ते मरीन ड्राइव्ह एक लेन वाहतुकीसाठी सज्ज!
Updated on

Mumbai Costal Rode: वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान चार लेनच्या एका मार्गिकेचे लोकार्पण १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. परंतु मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

लोकार्पण पुढे ढकलल्याने पहिल्या टप्प्यातील थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानची मुंबईकरांची सफर हुकली आहे. दरम्यान, चार लेनच्या एका मार्गिकेचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून एकूण प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे पालिकेने सांगितले.

Mumbai Costal Rode: वरळी ते मरीन ड्राइव्ह एक लेन वाहतुकीसाठी सज्ज!
Mumbai Costal Rode: त्या आल्या अन् पाहातच राहिल्या; इस्त्राईलच्या महिला मंत्र्याची कोस्टल रोडला भेट

कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला. त्यानंतर मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्याने कोस्टल रोड प्रकल्पाचा वेग मंदावला होता. परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतर २०२२ पासून कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. सद्यस्थितीत ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

तर थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान चार लेनच्या एक मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचे लोकार्पण होणार होते.

Mumbai Costal Rode: वरळी ते मरीन ड्राइव्ह एक लेन वाहतुकीसाठी सज्ज!
Mumbai Rode News: मुंबईजवळील गावांचा वनवास संपणार ; मिळणार हक्काचे रस्ते !

परंतु मोदी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने हा लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत कोस्टल रोडची सफर करण्याचा मुहूर्त हुकला आहे.

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे.

हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ असा केवळ बारा तासच सुरू राहणार आहे. कोस्टल रोडचा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे काम आणि कोस्टल रोडला वरळी आणि शिवडी सागरी सेतू जोडण्याचे काम करण्यात येणार आहे.

Mumbai Costal Rode: वरळी ते मरीन ड्राइव्ह एक लेन वाहतुकीसाठी सज्ज!
Mumbai Rode Pit News : गोरेगावात रस्ता खचल्याने ट्रक गेला खड्ड्यात !

- भूमिगत पार्किंगमध्ये अमर सन्स येथे - २५६, महालक्ष्मी मंदिर व हाजी अली - १,२०० तर वरळी सी फेस येथे - ४०० वाहन क्षमता. मार्गावर वेग मर्यादा ताशी ८० ते १०० किमी.

- याठिकाणी एक 'फुलपाखरु उद्यानासह उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार असून लहानमुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ फळी, झोके असणार आहेत.

- बोगदे ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार आहेत.

- कंट्रोल रूम, स्वयंचलित नियंत्रण आणि पोलीस यासारख्या सुरक्षा यंत्रणांशी हे बोगदे जोडलेले असणार आहे हा मार्ग वरळी सी लिंक जोडणार.

- कोस्टल रोड प्रकल्पामुळे इंधनाची ३४ टक्के तर वेळेची ७० टक्के बचत होणार आहे. दक्षिण मुंबईचा प्रवास ४५ मिनिटांचा प्रवास दहा मिनिटांत होणार आहे.

Mumbai Costal Rode: वरळी ते मरीन ड्राइव्ह एक लेन वाहतुकीसाठी सज्ज!
Navi Mumbai News: दोन बांगलादेशींना खिडुकपाड्यातून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.