Mumbai Local Train : मुंबई लोकल कार्यालयीन वेळ बदलण्याची मागणी

Mumbai : लोकलमधील गर्दी कायम ; प्रशासनाकडून आस्थापनांना पुन्हा पत्र पाठवण्याचा निर्णय
Mumbai local office time change demand
Mumbai local office time change demandesakal
Updated on

Mumbai Local : मुंबई लोकलमधील गर्दीमुळे तिघा प्रवाशांचा बळी गेल्यामुळे गर्दीच्या वेळेतील वाढत्या प्रवासीसंख्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची दखल घेत महामुंबईतील सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे विनंती पत्र मध्य रेल्वेकडून पुन्हा पाठविण्यात येणार आहे. यापूर्वीही रेल्वेने कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मोहीम हाती घेतली होती; मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये कार्यालयीन वेळेत प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीमुळे अपघात घडत आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी आणि गर्दीचा ताण कमी करण्यासाठी सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. यांसदर्भात ८०० हून अधिक कार्यालयांना वेळा बदलण्याकरिता विनंती पत्र पाठविले होते.

आतापर्यंत या विनंती पत्राला केवळ ३३ कार्यालयांनी कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी संमती दिली आहे. जोपर्यंत आणखी मोठ्या संख्येने कार्यालये वेळेत बदल करणार नाहीत, तोपर्यंत याचा फायदा सर्व लोकांपर्यंत पोहोचणार नाही, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

बदल केलेल्या आस्थापना

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई विद्यापीठ, एसबीआय, पोस्ट मास्टर जनरल, महासंचालक शिपिंग मुंबई, वस्त्रोद्योग आयुक्त, बीएसई, बीएआरसी, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, गोदरेज आणि बॉयस, एमआरव्हीसी, जमनालाल बजाज संस्था, पारसी जिमखाना, हिंदुस्थान पेन्सिल लिमिटेड, नोव्होटेल, ब्लू स्टार अशा ३३ आस्थापनांनी कार्यालयीन वेळेत बदल करण्यास सहमती दर्शवली.

काय आहे फार्म्युला?

शासकीय, खासगी आस्थापनांच्या कार्यालयीन वेळा जवळपास सारख्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी मुंबईत लाखो कर्मचारी लोकल प्रवास करतात. त्यामुळे सकाळी ७ ते १०, संध्याकाळी ५ ते १० पर्यंत कर्मचाऱ्यांची तोबा गर्दी असते; मात्र आस्थापनांनी कार्यालयीन वेळ बदलली, तर ही गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.