Mumbai Congress: दिड वर्षानंतर मुंबई महिला काँग्रेसची कार्यकारणी जाहिर

नव्याने वाद उफाळण्याची शक्यता
mumbai congress
mumbai congresssakal
Updated on

अलका लांबा यांनी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर संघटनेच्या थांबलेल्या नियुक्तांच्या मार्ग मोकळा झाला आहे.या अंतर्गत गेल्या दिड वर्षापासून रखडलेल्या मुंबई महिला प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारीणीला हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र यामुळे पक्षात नव्या शितयुध्दाला तोंड फुटू शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

mumbai congress
Congress on Ram Mandir: 'काँग्रेसने सर्वसमावेश होण्याची संधी गमावली', भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांकडून काँग्रसला टोला

मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिषा बागूल यांनी दिड वर्षापुर्वी संघटनेची नियुक्ती केली. मात्र अजूनपर्यंत या कार्यकारणीला मंजूरी मिळाली नव्हती. शनिवारी (ता.१४) या नियुक्त्यांना अधिकृत मान्यता मिळाली. या कार्यकारीणीत विधानसभा मतदारसंघनिहाय उपाध्यक्ष,महासचिव आणि सचिवांचा समावेश आहे तर ६ जिल्हाध्यक्षांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

या यादीत प्रज्योती हंडोरे यांचे नाव आहे. प्रज्योती या माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची कन्या आहे. महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे दक्षिण मध्य जिल्हाच्या महिला काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवली गेली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा धारावी विधानसभा मतदारसंघही यामध्ये येतो. वर्षा गायकवाड आणि चंद्रकांत हंडोरे यांचे संबध कायम तणावाचे राहीले आहे. दक्षिण-मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा हंडोरे यांनी यापुर्वी व्यक्त केली आहे.तर या मतदारसंघावर वर्षा गायकवाड यांचा नैसर्गिक दावा आहे.

mumbai congress
Congress Lok Sabha Election: कॉंग्रेसतर्फे रावेरमधून 3, जळगावमधून 5 इच्छुक! लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी तयारी

जर गायकवाड यांनी लोकसभा निवडणूक लढवली तर धारावी मतदारसंघातून प्रज्योती यांना उमेदवारी द्यावी अशी हंडोरे यांची मागणी असल्याचे कळते. त्यामुळे दिल्लीतील आपले वजन वापरुन या कार्यकारणीची मंजूरी दिड वर्षे रोखून ठेवली होती असे सुत्रांकडून सांगण्यात येते.

मुंबई प्रदेश महिला संघटनाही मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या नेतृत्वात काम करते.मुंबईची धुरा वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांना मात देणे एवढे सोपे नाही.मात्र तरीही काँग्रेसमधील अतंर्गत वादविवाद बघता दोन्ही गटामध्ये नव्याने संघर्ष पेटू शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात.

mumbai congress
Congress Foundation Day: "काँग्रेस पक्ष विदर्भातून नवीन सुरुवात करतोय"; बदल घडण्याचा यशोमती ठाकूरांना विश्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.