मुंबई : 'दिलदार' कंत्राटदारांमुळे वाचले पालिकेचे 16 कोटी

महागाई वरुन नेहमीच चर्चा होत असली तरी महानगर पालिकेवर कंत्राटदार मेहरबान झाले आहेत.
Mumbai-Municipal
Mumbai-MunicipalSakal
Updated on

मुंबई : महागाई वरुन नेहमीच चर्चा होत असली तरी महानगर पालिकेवर कंत्राटदार मेहरबान झाले आहेत. महानगर पालिकेच्या अंदाजित खर्चा पेक्षा कमी खर्चात काम करण्याची तयारी दाखवून कंत्राटदारांनी करदात्यांचे तब्बल 16 कोटी 34 लाख रुपये गेल्या 15 दिवसात फक्त सहा कामांमध्ये वाचवले आहेत.

महानगर पालिका कोणतेही काम करण्यापुर्वी अंदाजपत्र तयार केले जाते. हे अंदाजपत्र 2018 किंवा 2019 त्या कामासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरांवर आधारीत तयार केले जाते. मात्र, कंत्राटदार पालिकेच्या अंदाजा पेक्षा तब्बल 30 ते 35 टक्के कमी दराने काम करत आहेत.

Mumbai-Municipal
`मोबाईल रिचार्जच्या दरा`ने ग्रामीण भागातील अर्थिक घडी विस्कटली

प्रामुख्याने बांधकामाशी संबंधीत असलेल्या कामांमध्ये असे प्रकार आढळत आहेत. गेल्या पंधरावड्यात महानगर पालिकेने असे सहा प्रस्ताव मिळून 19 कोटी 34 लाख रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडले आहेत. मात्र, प्रत्यक्षात पालिकेच्या अंदाजपत्रकानुसार हा खर्च 35 कोटी 35 लाख रुपये होता. यातील काही कामांना स्थायी समितीनेही मंजूरी दिली आहेत.तर,काही प्रस्ताव येत्या आठवड्यात चर्चेला येतील.

कंत्राटदाराने 20 ते 25 टक्के कमी दराने निवीदा भरल्यास पालिका पात्र कंत्राटदारांकडून दरपत्रक मागवते. हे दरपत्रक पडताळून पाहिले जाते. ते व्यवहार्ऱ्य असल्यास पालिकेने कंत्राट देते अथवा नव्याने निवीदा मागवल्या जातात. कंत्राटदार कमी दराने व्यवहार्य असतात. मग, महापालिकेचे अंदाजपत्र कसे जास्त किंमतीचे असते.असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

या कामांमध्ये पालिकेची बचत

- पवई तलावातील तरंगत्या वनस्पतींसह साफ सफाईसाठी पालिकेने 16 कोटी 45 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. प्रत्यक्षात कंत्राटदार 46.8 टक्के कमी दराने काम करुन 8 कोटी 87 लाखात हे काम काम होणार आहे.

-दादर पश्‍चिमेकडील परीसरातील विविध पदपथांची दुरुस्ती,सुशोभीकरणासाठी पालिकेने 3 कोटी 21 लाखाचा खर्च अंदाजित होता. मात्र,कंत्राटदार हे काम 37 टक्के कमी दराने 2 कोटी 10 लाखात करणार आहे.

-बोरीवली परीसरातील नाल्याची दुरुस्ती 34 टक्के कमी दराने 2 कोटी 90 लाख रुपयात होणार आहे.पालिकेचा अंदाज 3 कोटी 40 लाख रुपयांचा होता.

-भायखळा येथील मोहम्मद सुफी अब्दुल सुफी रेहमान क्रिडांगण (झुला मैदान ) दुरुस्ती,सुशोभीकरणासाठी कंत्राटदार 34.11 टक्के कमी दराने 84 लाख 4 हजारात काम करणार आहे.पालिकेने 1 कोटी 22 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते.

-शिव प्रतिक्षा नगर येथील रघुनाथ चव्हाण उद्यान,अशोक पिसाळ मैदान ,माहिम येथे रमा गवंडी मनोरंजन उद्यानासाठी पालिकेने

Mumbai-Municipal
मुंबई : आरे डेपो स्थलांतरण अधांतरी

-3 कोटी 67 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते.प्रत्यक्षात 34 .29 टक्के कमी दराने 2 कोटी 50 लाख रुपयात काम होणार आहे

-कांदिवली महाविर नगर गोपिनाथ मुंडे उद्यानाची सुधारणेसाठी पालिकेने 2 कोटी 42 लाखांचे अंदाजपत्र तयार केले होते.तर,कंत्राटदार 33.36 टक्के कमी दराने काम करणार असून 1 कोटी 67 लाखात हे काम होणार आहे.

-कांदिवली लोखंडवाला संकुल येथील विलासराव देशमुख पार्कचा कायापालट करण्यासाठी 4 कोटी 88 लाख रुपयांचे अंदाजपत्रक होते.मात्र,कंत्राटदार 3 कोटी 36 लाख रुपयात काम करणार.पालिकेच्या अंदाजापेक्षा 33.88 टक्के कमी दराने काम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.