मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत बोगस लसीकरण (Corona fake Vaccination Scam) घोटाळ्याने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या अधिकृत लशींऐवजी चक्क पाण्याचा वापर केलेल्या बोगस लस (water Saline Vaccine) नागरीकांना दिल्या जात आहेत. मुंबईत तब्बल 4000 नागरिकांना (Fake Vaccine Impact) या बोगस लसीकरणाचा फटका बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बोगस लसीकरण रॅकेटचा (Mumbai Police Action) पर्दाफाश करुन आरोपींना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये हॅास्पिटलचे मालक, डॅाक्टर, वैद्यकीय संघटनेचा माजी सदस्य, हॅास्पिटलचा माजी कर्मचारी आणि एका व्यवस्थापकाचा सहभाग आहे. (Mumbai Corona Fake vaccination Scam open up lack of funds in hospital)
चारकोप शिवम हॅास्पिटलमध्ये बोगस लसीकरणाचे गैरप्रकार सुरु होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत शिवम हॅास्पिटल बंद कले. 5 मार्च ते 28 एप्रिल दरम्यान शिवम हॅास्पिटल खासगी लसीकरण केंद्र होते. त्यावेळी 16000पेक्षा जास्त लशींच्या मात्रा देण्याचा कारभार या हॅास्पिटल मध्ये सुरु होता. तसंच 1 लाख अधिक लशी थेट उत्पादकांकडून मिळवण्याचा हॅास्पिटल प्रशासनाचा उद्देश होता, अशी माहिती शोधपथकाने दिली आहे. मालाड मेडिकल संघटनेचा माजी सदस्य महेंद्र सिंग याच्या मदतीने लसीकरण केंद्रात नागरिकांची नोंदणी केली जात होती. हॅास्पिटल प्रशासनाला पुरेसा निधी न मिळाल्याने 1 लाख लशींचे डोस विकत घेण्यात प्रशासनाला अडचण निर्माण झाली.
शिवम हॅास्पिटलला खासगी लसीकरण केंद्र म्हणून बंद करण्यात आले होते. मात्र, असे असतानाही हॅास्पिटल प्रशासनाकडून आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांना पाण्याचा वापर करुन बोगस लस देण्यात आल्या. या बोगस लसीकरणात हॅास्पिटल प्रशासनाचे डॅा. मनिष त्रिपाठी, निता पटारिया यांचा सहभाग आहे. अशी माहिती या प्रकरणात तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकांनी दिली आहे. तसेच हॅास्पिटल प्रशासनाच्या संकल्पनेचे काही दुष्परिणाम होतील का? याची शहानीशा करण्यासाठी त्रिपाठीचा विद्यार्थी करीम अली याचाही समावेश करण्यात आला होता. डॅा. मनिष त्रिपाठी,निता पटारिया आणि करीम अली या तिघांनाही पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ''या तिनही आरोपींकडून पाण्याद्वारे लशी देण्याची संकल्पना आखण्यात आली. त्यानंतर इव्हेंट मॅनेजर संजय गुप्ताही या बोगस लसीकरणात सामील झाला. तसंच कोकीलाबेन हॅास्पिटलचा माजी कर्मचारी राजेश पांडेलाही सिंग याने या बोगस लसीकरणात सामिल केले. सिंग,डॅा त्रिपाठी आणि निता यांनी मालाडच्या एका रिसॅार्टमध्ये आर्थिक बाबींवर तसेच पुढच्या कंपनीवर लक्ष्य करण्यासाठी चर्चा केली होती. 15 जूनच्या आधी संगळ काही त्यांच्या रणनीतीनुसार सुरु होतं.
मात्र, कांदीवलीच्या हिरानंदानी हेरीटेज मधील नागरिकांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र न मिळाल्याचं पोलिसांना कळवलं. त्यानंतर हे प्रकरणं उघडकीस आलं. आरोपींकडून खासगी हॅास्पिटलच्या आणि महापालिकेच्या नेस्को जम्बो कोविड सेंटरच्या लॅागईन आयडीचा काही प्रमाणपत्र बनवण्यासाठी गैरवापर करण्यात आला. पण त्या प्रणाणपत्रांवर चुकीचा तपशील असल्याने त्यांची गोत्यात सापडले. 12 लसीकरण केंद्रांपैकी जवळपास 9 केंद्रामध्ये पाण्याचा वापर करुन बोगस लसीकरण करण्यात आले.''
''24 जूनपासून निता आणि शिवराज पटारीया पोलीस कोठडीत आहेत. शिवम हॅास्पिटलच्या कागदपत्रांशिवाय पोलिसांना काहीच सापडलं नाहीये. आरोपी सहकाऱ्यांनी दिलेल्या जबाबावरुनच या दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात या पुराव्याला गंभीरपणे पाहिलं जात नाही. अशी माहिती या दाम्पत्याचे वकील क्षितीज मेहता यांनी दिली आहे. त्रिपाठीच्या वकीलाने याविषयी बोलण्यास नकार दिलाय. तर त्रिपाठीला पोलीस कोठडीत त्रास दिला जात आहे. असा दावा बोरिवलीच्या न्यायालयात त्रिपाठीच्या वकीलांकडून रविवारी करण्यात आला होता.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.