मुंबईत कोविडच्या ४४० नव्या रुग्णांचे निदान, तर १३ रुग्णांचा मृत्यू

corona
coronasakal media
Updated on

मुंबई   : आज 440 नवीन रुग्ण (new corona patient) सापडले. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,35,505 इतकी झाली आहे.आज 403 रुग्णांनी कोरोनावर मात केली (coronafree patient) असून आतापर्यंत 7,12,100 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 35,393 कोविड चाचण्या (Corona test) करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 80,86,152 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ( Mumbai corona patient details including covid test-nss91)

मुंबईत आज दिवसभरात केवळ 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून बुधवार च्या तुलनेत मुंबईतील मृत्यूची संख्या वाढली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 808 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 11 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 8 पुरुष तर 5 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील,एक रुग्ण 40 ते 60 वयोगटा दरम्यानचा तर इतर 11 रुग्णांचे वय 60 वर्षाच्या वर होते.

corona
बारावीच्या निकालाबाबत अद्यापही अनिश्चितता कायम!

रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,405 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.5 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 5,201 हजारांवर आला आहे. मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या संख्या 5 झाली. सीलबंद इमारतींची संख्या 54 झाली आहे. गेल्या 24 तासांत 3,344 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 832 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.