corona virus
corona virus

मुंबईसाठी धोक्याची घंटा! कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 50 हजारांच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या आजची आकडेवारी  

Published on

मुंबई: सतत निरनिराळ्या संकटांचा जिद्दीनं सामना करणाऱ्या  मुंबईभोवती कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ५० हजारांच्या उंबरठ्यावर आहे. आज मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा ४९ हजार ८०० च्या पार पोहोचला आहे.  त्यामुळे मुंबईसाठी ही धोक्याची घंटा आहे. मुंबईकरांनी नियम पाळले नाहीत तर हा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.  

मुंबईतील रुग्णवाढ सुरूच असून रुग्णांचा आकडा हजाराच्या खाली येतांना दिसत नाहीये. आज ही मुंबईतील बाधित रुग्णांच्या संख्येत 1,314 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 49,863 झाली आहे. तर आज 64 जणांचा मृत्यू झाला असून  मृतांचा एकूण आकडा 1700 वर पोहोचला आहे.     

मुंबईत आज नोंद झालेल्या 64 मृत्यूंपैकी 43 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 44 पुरुष तर 20 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी तिघांचे वय 40 च्या खाली होते. तर 38 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर  23 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                           

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 654 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 37,013 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 842 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  22,038 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

मात्र लगेच घाबरण्याची गरज नाही. आजपर्यंत मुंबईवर खूप संकटं आलीत मात्र मुंबईनं त्यातून स्वतःला सावरत एक नवी वाट  मुंबईकरांना दाखवली आहे. म्हणूनच यावेळी कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना मुंबईकरांना एकजुटीनं करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणं महत्वाचं आहे.  

mumbai corona patients numbers are near 50 thousand read full story  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.