मुंबई : मुंबईत 2 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला असून 168 नवीन रुग्ण (corona new patients) आढळले. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,64,003 वर पोहोचली आहे. आज 250 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,43,365 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.
मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 1714 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 3079 दिवस झाला आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.02 पर्यंत खाली आला आहे.
आज 2 कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,351 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.02 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 24,440 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,26,43,665 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.